सायखेडा परिसरात बाजारपेठा पुन्हा थंडावल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 01:18 IST2021-03-18T19:39:28+5:302021-03-19T01:18:56+5:30
सायखेडा : कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता शासनाने कठोर निर्बंध लागू केले असल्यामुळे बाजारपेठेतील कपड्याची दुकाने ओस पडू लागली आहेत.

सायखेडा परिसरात बाजारपेठा पुन्हा थंडावल्या
सायखेडा : कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता शासनाने कठोर निर्बंध लागू केले असल्यामुळे बाजारपेठेतील कपड्याची दुकाने ओस पडू लागली आहेत. तसेच ग्राहक फिरकेनासे झाले आहेत. त्यामुळे बाजारपेठा पुन्हा थंडावल्या आहेत.
मंगल कार्यालय, लग्नसमारंभावर आदी गोष्टींवर कोरोनाचे निर्बंध लादल्यामुळे बाजारपेठेतील ग्राहकवर्ग कमी झाला आहे. गेल्या मार्चपासून कापड दुकानदारवर्ग पुरता वैतागला आहे. त्यामुळे संपूर्ण व्यवसायधारक अडचणीत आले आहेत.
सध्या मार्च महिन्यापासून मे, जूनपर्यंत कपडे खरेदी करण्यासाठी लोकांची झुंबड उडालेली असते. कारण, लग्नसमारंभावर मर्यादा आल्या व मोठे समारंभ पार पडणे बंद झाले, त्यामुळे सर्व कापड व्यवसायावर संक्रांत आली आहे. जनतेने शासनाने ठरवून दिलेल्या नियमावलीचे कठोर पालन करून लवकरात लवकर कोरोनाला हद्दपार केले पाहिजे.
सध्याच्या वातावरणात बाजारपेठा थंडावल्या आहेत. कोरोना रुग्णांचा आकडा वरचेवर वाढत असल्यामुळे शासनाने कडक पावले उचलली आहेत. त्यामुळे लग्नसमारंभावर मर्यादा आल्या व कापड व्यावसाय व इतर अनेक व्यावसायिक अडचणीत आले आहेत.
-संतोष जाधव, कापड व्यावसायिक.