उंबरगव्हाण येथे आता आठवडे बाजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2019 13:30 IST2019-09-04T13:29:05+5:302019-09-04T13:30:00+5:30
देसराणे : कळवण तालुक्यातील पुनद खोऱ्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या उंबरगव्हाण येथे दि. ३० सप्टेंबर पासुन दर मंगळवारी आठवडे बाजार सुरु करण्यात आला आहे.

उंबरगव्हाण येथे आता आठवडे बाजार
देसराणे : कळवण तालुक्यातील पुनद खोऱ्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या उंबरगव्हाण येथे दि. ३० सप्टेंबर पासुन दर मंगळवारी आठवडे बाजार सुरु करण्यात आला आहे. या आठवडे बाजाराच्या उदघाटनप्रसंगी कळवण पंचायत समितीचे तहसीलदार यांच्या सह सर्व विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. आठवडे बाजार सुरु झाल्याने कळवण तालुक्यातील अतिदुर्गम भागातील तसेच कळवण तालुक्याच्या सीमेवर असलेल्या बागलाण व गुजरातच्या काही गावांना फायदा होणार आहे. यापूर्वी कळवण बागलाण गुजरात या सीमेवरील गावांना कळवण तालुक्यातील जयदर , कनाशी व बागलाण तालुक्यातील साल्हेर या गावांना आठवडे बाजारासाठी २० ते २५ किलोमीटर अंतरावर बाजारासाठी जावे लागत होते. जयदर व साल्हेर कडे जाण्यासाठीचा रस्ता अनेक ठिकाणी नागमोडीचा व वळणे असल्याने या भागातील आदिवासी जनतेला एस.टी.ने तर अनेक वेळा खाजगी वाहनाने जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत असे व बाजारासाठी पूर्ण दिवस वाया जात होता. मात्र कळवण , बागलाण व गुजरातच्या काही भागातील सीमेवर हा उंबरगव्हाण येथे बाजार सुरु झाल्याने या भागातील आदिवासी नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.
------------------
या गावांना होणार बाजारांचा फायदा
बंधारपाडा , औत्यापाणी , उंबरगव्हाण , भौती , महाल , चोळीचा माळ , किरिमल्या , उंबरदा , निळगव्हाण , मानूर , हनुमंतमाळ , बेड्याचा माळ , जांभाळ , डोन , नारीआंबा , मोºयाहूब , शिरसा , घोडी यांसह २० ते २५ खेड्यांना बाजारामुळे सोय होणार आहे.