Market transactions at Nandurshingote pre-positioned | नांदूरशिंगोटे येथे बाजारपेठेतील व्यवहार पूर्वपदावर

नांदूरशिंगोटे येथे बाजारपेठेतील व्यवहार पूर्वपदावर

ठळक मुद्देव्यवहार सुरळीत सुरू झाले आहे.

नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटेसह परिसरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामस्थ, प्रशासन व व्यापारी यांनी सात दिवस जनता कर्फ्यु लागु करण्यात आला होता. जनता कर्फ्युस सर्वांनी प्रतिसाद दिल्याने कोरोनाची साखळी तोडण्यास काही प्रमाणात यश आल्याने सोमवार (दि.५) पासून येथील बाजारपेठ पूर्वपदावर आल्याने व्यवहार सुरळीत सुरू झाले आहे.
सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथील परिसरातील सर्वात मोठी बाजारपेठ असल्याने खरेदी विक्र ीसाठी मोठ्या प्रमाणात येथे गर्दी होत असते. तसेच आॅगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तसेच सप्टेंबर महिन्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव येथे मोठ्या प्रमाणात वाढला होता. जवळपास एका महिन्यात ५० ते ६० रु ग्ण कोरोना बाधित आढळून आल्याने ग्रामस्थांमध्ये घबराट निर्माण झाली होती. त्यामुळे गावात जनता कर्फ्यु लागू करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली होती. त्यानतंर ग्रामपंचायत प्रशासन, ग्रामस्थ व व्यापारी यांच्यात बैठक होवून सर्वानुमते सात दिवस जनता कर्फ्युबाबत निर्णय घेण्यात आला. सोमवार दि २८ सप्टेंबर ते ४ आॅक्टोबर पर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बाजारपेठ व व्यवहार बंद ठेवण्यात आले होते. सर्वांनी कडकडीत बंद पाळून कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रतिसाद दिला.
सप्टेंबर महिन्यात पहिल्यांदा चार दिवसाचा व शेवटच्या आठवड्यात सात दिवसाचा असा ११ दिवस बंद पाळण्यात आला होता. नेहमीच होणाऱ्या बंदमुळे छोटे-मोठे दुकानदार व व्यावसायिक हतबल झाले होते. परंतु त्यांनाही बंदला प्रतिसाद देत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मदत केली आहे. जनता कर्फ्युनतंर सोमवारी (दि. ५) पुन्हा बाजारपेठ सुरू झाली असून सर्व व्यवहार पूर्वपदावर आले आहे.
सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या येथील उपबाजारात कांदा विक्र ीचे व्यवहार सुरु करण्यात आले आहे. तसेच अनलॉक ५ मध्ये हॉटेल व रेस्टॉरंट सुरु झाले आहे. प्रत्येक व्यावसायिकांनी सोशल डिस्टन्स, मास्क, सॅनिटायझर तसेच ग्राहकांमध्ये अंतर ठेवून व्यवहार केले पाहिजे असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

Web Title: Market transactions at Nandurshingote pre-positioned

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.