नाशिकच्या बाजारात मेथी ३ रूपये प्रतिजुडी; आवक वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2017 21:01 IST2017-12-06T20:58:43+5:302017-12-06T21:01:00+5:30
गेल्या दोन दिवसांपासून नाशिकहून गुजरात आणि मुंबईकडे जाणारा भाजीपाला रवाना होऊ शकला नाही. परिणामी शेतकºयांना आपला माल नाशिकच्याच बाजार समितीत आणावा लागत असल्याने आवक वाढून भाजीपालच्याचे भाव चांगलेच घसरले आहे. बुधवारी मेथीला ३०० रुपये शेकडा भाव मिळाला म्हणजेच जुडी ३ रुपये प्रमाणे विकली गेली तर कोथिंबीरचे भाव १ रूपये जुडीवरून २ रूपयांपर्यत आले आहेत.

नाशिकच्या बाजारात मेथी ३ रूपये प्रतिजुडी; आवक वाढली
नाशिक : ओखी वादळामुळे गेल्या दोन दिवसांपासून मुंबईतील भाजी बाजारात पालेभाज्यांचे भाव घसरल्याने नाशिकहून मुंबईला भाजीपाला रवाना होऊ शकला नाही. परिणामी नाशिक बाजारात आवक वाढल्याने कोथिंबीरला शेकडा तीनशे म्हणजेच जुडीला तीन रूपये असा भाव मिळाला. मंगळवारी कोथिंबीर एक रूपया भावाने जुडी विकली गेली होती. बुधवारी कोथिंबीरच्या किंमतीत किंचितसी वाढ झाली.
गेल्या दोन दिवसांपासून नाशिकहून गुजरात आणि मुंबईकडे जाणारा भाजीपाला रवाना होऊ शकला नाही. परिणामी शेतकºयांना आपला माल नाशिकच्याच बाजार समितीत आणावा लागत असल्याने आवक वाढून भाजीपालच्याचे भाव चांगलेच घसरले आहे. बुधवारी मेथीला ३०० रुपये शेकडा भाव मिळाला म्हणजेच जुडी ३ रुपये प्रमाणे विकली गेली तर कोथिंबीरचे भाव १ रूपये जुडीवरून २ रूपयांपर्यत आले आहेत.
नाशिक कृषी उत्पन्न बाजारसमितीत बुधवारी मेथी भाजीची मोठया प्रमाणात आवक झाली मात्र ओखी वादळामुळे मुंबईत शेतमालाला उठाव नसल्याने त्याचा परिणाम नाशिकच्या स्थानिक बाजारभावावर झाला. बुधवारी सायंकाळी झालेल्या लिलावात मेथीला ३ रूपया प्रति जुडी (शेकडा ३००) रूपये असा निच्चांकी बाजारभाव मिळाला. .
लागवडीचा व दळणवळणाचा खर्च देखील न सुटल्याने शेतकºयांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मंगळवारी व बुधवार सकाळपासून ढगाळ हवामान व त्यातच पावसाने हजेरी लावली होती. ओखी वादळामुळे मुंबईत पावसाने हजेरी लावल्याने बाजारात उठाव नसल्याने शेतमाल पडून होता. त्यातच गुजरातमध्ये स्थानिक भाजीपाला उपलब्ध झाल्याने नाशिकहून गुजरातकडे जाणारा माल जाऊ शकला नाही. त्यामुळे बाजारात मोठ्या प्रमाणात आवक वाढल्याने भाव घसरले.