सायगावमध्ये आठवडे बाजार बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2020 00:10 IST2020-03-19T22:04:19+5:302020-03-20T00:10:32+5:30

येवला तालुक्यातील सायगाव ग्रामपंचायतीने ३१ मार्चपर्यंत येथे भरत असलेला रविवार आठवडे बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे, तर कोरोना या संसर्गजन्य आजारापासून सावधगिरी बाळगण्यासाठी माहितीचा फलक लावला आहे.

Market closed in Saigon for weeks | सायगावमध्ये आठवडे बाजार बंद

सायगावमध्ये आठवडे बाजार बंद

ठळक मुद्देकोरोना : जागृतीसाठी झळकले फलक

सायगाव : येवला तालुक्यातील सायगाव ग्रामपंचायतीने ३१ मार्चपर्यंत येथे भरत असलेला रविवार आठवडे बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे, तर कोरोना या संसर्गजन्य आजारापासून सावधगिरी बाळगण्यासाठी माहितीचा फलक लावला आहे.
ग्रामीण भागातून कोरोना आजाराबाबत प्रसारमाध्यमांसह सोशल मीडियावरून चांगलीच जनजागृती घडत आहे. या संदर्भात सायगाव ग्रामपंचायतीचे सरपंच योगीता भालेराव यांनी ग्रामपंचायत प्रशासनाला सूचना देत २२ व २९ मार्च
रोजीचे रविवारी भरणारे आठवडे बाजार बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
कोरोनाबद्दल गावात जनजागृती व घ्यावयाची खबरदारी म्हणून गावात सचित्र भव्य फलक लावला आहे. आबालवृद्धांसह ग्रामस्थ येता-जाता या फलकावरील मजकूर वाचताना दिसत आहे. दरम्यान, कोरोना व्हायरसमुळे ग्रामस्थही दहशतीत असून, यापासून बचावासाठी घराबाहेर पडणे टाळत आहेत. तर थोडाही सर्दी, खोकल्याचा त्रास जाणवल्यास दवाखान्यात जात आहेत.

Web Title: Market closed in Saigon for weeks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.