विवाहिता आत्महत्या; एकाला सक्तमजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2020 01:32 IST2020-09-23T22:14:14+5:302020-09-24T01:32:56+5:30
सटाणा : पत्नीचा शारीरिक व मानसिक छळ करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी मालेगाव जिल्हा अपर सत्र न्यायालयाचे न्यायाधीश अनिरुद्ध गांधी यांनी बागलाण तालुक्यातील बिरदावनपाडा येथील एकाला सात वर्ष सक्तमजुरी आणि २५ हजार रुपयांचा दंडाची शिक्षा ठोठावली.

विवाहिता आत्महत्या; एकाला सक्तमजुरी
लोकमत न्यूज नेटवर्क
सटाणा : पत्नीचा शारीरिक व मानसिक छळ करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी मालेगाव जिल्हा अपर सत्र न्यायालयाचे न्यायाधीश अनिरुद्ध गांधी यांनी बागलाण तालुक्यातील बिरदावनपाडा येथील एकाला सात वर्ष सक्तमजुरी आणि २५ हजार रुपयांचा दंडाची शिक्षा ठोठावली.
बिरदावनपाडा (मानूर) येथील साहेबराव पंडित गांगुर्डे याचा विवाह हतनूर येथील वसंत गवळी यांची मुलगी चंदा हिच्याशी झाला होता. चंदाला रवींद्र आणि गायत्री असे दोन अपत्यही आहेत. मात्र साहेबराव जुगार खेळण्यासाठी व मोटरसायकल घेण्यासाठी माहेरहून पैशांची मागणी करत करत होता. चंदाने त्याची मागणी पूर्ण न केल्याने तिचा शारीरिक व मानसिक छळ सुरू केला. साहेबरावच्या जाचाला कंटाळून २६ सप्टेंबर २०१५ रोजी स्वत:च्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून आत्महत्या केली. याप्रकरणी सटाणा पोलिसात आत्महत्येस प्रवृत्त करणे आदी गुन्हे साहेबराव गांगुर्डे विरुद्ध दाखल करण्यात आले. सबळ पुराव्यांमुळे मालेगाव जिल्हा अपर सत्र न्यायालयाचे न्यायाधीश अनिरुद्ध गांधी यांनी या खटल्याचा निकाल घोषित केला. आरोपीला हुंडाबळी प्रकरणी ३ वर्ष सक्तमजुरीची शिक्षा, २५ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास १० महिने शिक्षा तसेच आत्महत्येस प्रवृत्त केल्याने ७ वर्ष सक्त मजुरीची शिक्षा २५ हजार रुपये दंड व दंड भरल्यानंतर मुलांच्या नावे ५० हजारांची मुदत ठेव, अशी शिक्षा ठोठावली आहे.