चारित्र्याच्या संशयावरून विवाहितेचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2018 00:24 IST2018-05-05T00:24:23+5:302018-05-05T00:24:23+5:30

नांदगाव : तालुक्यातील कासारी येथील काळे वस्ती शिवारात, विवाहिता व तिचा एक वर्षाचा मुलगा यांना नवऱ्याने व इतर दोघींनी चारित्र्याचा संशय घेऊन ठार मारले अशी तक्रार मयत विवाहितेच्या वडिलांनी केल्याने खळबळ उडाली.

Marital murder on character suspicion | चारित्र्याच्या संशयावरून विवाहितेचा खून

चारित्र्याच्या संशयावरून विवाहितेचा खून

ठळक मुद्देसमाजातील सर्व स्तरातून या घटनेचा निषेधसुवर्णाचा दोराने गळफास लावून जिवे मारण्यात झाल्याचा संशय

नांदगाव : तालुक्यातील कासारी येथील काळे वस्ती शिवारात, विवाहिता व तिचा एक वर्षाचा मुलगा यांना नवऱ्याने व इतर दोघींनी चारित्र्याचा संशय घेऊन ठार मारले अशी तक्रार मयत विवाहितेच्या वडिलांनी केल्याने खळबळ उडाली असून, समाजातील सर्व स्तरातून या घटनेचा निषेध होत आहे. याप्रकरणी नांदगाव पोलिसात तक्रार दाखल झाली असून, आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दि. ३ मे रोजी सायंकाळी ७ ते ८ वाजेच्या दरम्यान ही घटना घडली. सुवर्णा काळे (२१) व तिचा एक वर्षाचा मुलगा स्वरूप या दोघांचा खून झाल्याची तक्र ार तिचे वडील चिंतामण कृष्णा देवरे (५२) बांधकाम ठेकेदार मनमाड यांनी केली आहे. मयत सुवर्णा हिचा कासारीच्या ज्ञानेश्वर ऊर्फ पंजाब काशीनाथ काळे याच्याशी दोन वर्षांपूर्वी विवाह झाला होता. कालांतराने तिला मुलगा झाला. त्याचे नाव स्वरूप ठेवण्यात आले. दरम्यान सुवर्णा हिच्या चारित्र्याचा संशय आल्याने पती ज्ञानेश्वर तिला शिवीगाळ, दमदाटी व मारहाण करून तिचा शारीरिक व मानसिक छळ करू लागला. तुला झालेला मुलगा माझा नाही असा संशय घेऊन नेहमी टोचून बोलू लागला. याची परिणती सुवर्णाचा दोराने गळफास लावून जिवे मारण्यात झाल्याचा संशय आहे. एक वर्षाचा स्वरूप यास विष पाजण्यात आले असेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. घटनेचा तपास पोलीस निरीक्षक बशीर शेख करीत आहे.

Web Title: Marital murder on character suspicion

टॅग्स :Crimeगुन्हा