शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
3
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
4
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
5
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
6
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
7
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
8
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
9
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
10
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
11
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
12
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
13
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
14
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
15
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
16
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
17
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
18
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
19
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
20
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
Daily Top 2Weekly Top 5

कसबे सुकेणेला बहरल्या झेंडूच्या बागा

By admin | Updated: October 13, 2015 22:19 IST

नाशिकसह मुंबई, सुरतला होते फुलांची रवानगी

कसबे सुकेणे : नवरात्रीच्या चैतन्य उत्सवात खऱ्या अर्थाने भर घालणाऱ्या झेंडूच्या फुलांच्या बागांचा कसबे सुकेणे शिवारात बहर आला असून वर्षभर मुंबई, सुरत, अहमदाबाद, नाशिककरांना पुरवल्या जाणाऱ्या गुलाबाबरोबर आता झेंडूही या मार्गाने निघाला आहे . द्राक्ष, ऊस व भाजीपाला पिकांसाठी प्रसिद्ध असलेल्या निफाड तालुक्यातील कसबे सुकेणे, मौजे सुकेणे या शिवारात फूल शेतीही चांगली बहरली आहे. नाशिक, मुंबई, पुणे, सुरत या मोठ्या शहरांना वर्षभर कसबे सुकेणे येथून गुलाबाच्या विविध जातींची फुले विक्र ीसाठी पाठविली जातात. कसबे सुकेणे येथे टाटा व ग्यलिटीयर या दोन जातींचे प्रमुख उत्पादन घेतले जाते. यंदा गुलाबा बरोबर झेंडूच्या बागांनी सुकेणे व परिसराचा शिवार नटला असून, या बागा कोकणगाव-सुकेणे रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्यांचे आकर्षण ठरत आहे. नवरात्र उत्सवात व विजयादशमीच्या दिवशी झेंडूला मोठी मागणी असते. दिवाळी सणात झेंडूच्या फुलांना महत्त्व असते, म्हणून चार पैसे मिळतील या आशेने शेतकऱ्यांनी झेंडूच्या बागा लावल्या आहेत. कसबे सुकेणेची या शेतीमुळे गेल्या काही वर्षांपासून देशभरात नवी ओळख तयार झाली आहे. कमी पावसामुळे यंदा फूल शेतीलाही फटका बसला असून प्रतिकूल परिस्थितीत शेतकऱ्यांनी फुलबागा जगविल्या आहेत त्यामुळे झेंडू व गुलाबाच्या उत्पादन खर्चातही वाढ झाली आहे. (वार्ताहर)