पेठ येथील जनता विद्यालयात मॅरेथॉन स्पर्धा

By Admin | Updated: January 18, 2016 22:35 IST2016-01-18T22:33:57+5:302016-01-18T22:35:22+5:30

पेठ येथील जनता विद्यालयात मॅरेथॉन स्पर्धा

Marathon Tournament at Janata Vidyalaya in Peth | पेठ येथील जनता विद्यालयात मॅरेथॉन स्पर्धा

पेठ येथील जनता विद्यालयात मॅरेथॉन स्पर्धा

पेठ : येथील जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय आणि सार्वजनिक वाचनालय, पेठ यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी विविध मैदानी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.यात विजय मॅरेथॉन व सायकल स्पर्धांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला़
जिल्हा परिषद शिक्षण समिती सदस्य भास्कर गावित यांच्या
हस्ते मॅरेथॉन स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी पोलीस निरीक्षक व्ही़ डी़ ससे, डांग
सेवा मंडळाचे सचिव डॉ़ विजय बीडकर, संचालक अ‍ॅड़ मृणाल जोशी, प्राचार्य ए़ एम़ बागुल
आदि उपस्थित होते़ यावेळी शालेय व महाविद्यालयीन गटातून विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग घेतला़ सायकल स्पर्धेत मुलांनी बाजी मारली़
विद्यालयात सुंदर हस्ताक्षर, मेहंदी, रांगोळी, वक्तृत्व आदि स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते़ क्रीडाशिक्षक चंद्रशेखर पठाडे, सी़ टी़ आचार्य, आऱ एऩ पाटील, व्ही़ एस़ चौधरी यांच्यासह शिक्षकांनी परीक्षणाचे काम पाहिले.
यावेळी उपप्राचार्य के.एऩ खरे, एऩ आऱ शिंदे, प्रशांत कोष्टी, सार्वजनिक वाचनालयाचे ग्रंथपाल श्याम वाघ यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी, पालक उपस्थित
होते़ (वार्ताहर)

Web Title: Marathon Tournament at Janata Vidyalaya in Peth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.