शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा अध्यक्षपदाबाबत टीडीपीची अट; भाजपचं टेन्शन वाढलं, नितीशकुमार आता काय करणार?
2
"मुस्लिमांची मतं मिळाल्याचा अभिमान वाटत असेल तर..." बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंना टोला
3
मुख्यमंत्री देवदूतासारखे धावले; अपघातग्रस्तांना मदतीचा हात: संवेदनशील स्वभावाचा पुन्हा प्रत्यय
4
दहशतवाद्यांची आता खैर नाही, अमित शाह उच्चस्तरीय बैठक घेणार, अजित डोवाल आणि रॉ प्रमुखही उपस्थित राहणार
5
"पाकिस्तानी खेळाडूंना वाटते की...", वसीम अक्रम संतापला; PCB कडे केली मोठी मागणी
6
T20 World Cup 2024: सुपर आठमध्ये अनपेक्षित निकाल शक्य
7
तलाठी परीक्षा घोटाळ्याचा मास्टर माईंड जेरबंद; नऊ महिन्यांपासून देत होता गुंगारा
8
ऑस्ट्रेलियाला घाम फोडणारा स्कॉटलंड; पराभव होताच कर्णधार भावूक, मार्शकडून कौतुक
9
AUS vs SCO : ऑस्ट्रेलियाच्या जिवावर गतविजेते 'शेर', इंग्लंड सुपर-८ मध्ये; स्कॉटलंडचे स्वप्न भंगले
10
"झुंड में तो कुत्ते आते है...", राणे-सामंत यांच्यातील फलक युद्धाचे लोण रत्नागिरीपर्यंत
11
भारत G7 परिषदेचा सदस्य नाही, तरीही PM मोदी केंद्रस्थानी! जागतिक पटलावर काय आहे अर्थ?
12
पाऊस पडावा म्हणून लोकांचं अजब कृत्य; लावले दोन बेडकांचे लग्न!
13
स्पेशल रिपोर्ट: अशोक चव्हाणांवरील 'त्या' आरोपांची विखे करणार चौकशी
14
"खटाखट, टकाटक लूट शुरू…", कर्नाटकात पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवरून भाजपचा निशाणा
15
सांगलीच्या पठ्ठ्याची कहाणी प्रेक्षकांना भावली, 'चंदू चँपियन'च्या कमाईत वाढ झाली
16
एकत्रित लढू अन् सत्ताबदल करू; महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांनी व्यक्त केला निर्धार!
17
आजचे राशीभविष्य, १६ जून २०२४ : मिथुनसाठी काळजीचा अन् वृश्चिकसाठी आनंदाचा दिवस
18
T20 WC, AUS vs SCO : सुपर-८ साठी चुरस! ऑस्ट्रेलियाची बेक्कार धुलाई; इंग्लंडची धाकधुक वाढली
19
वादाची ठिणगी पडली; महायुतीत आम्हीच मोठे भाऊ असल्याचा शिंदेसेनेचा दावा 
20
मुख्य, हार्बर मार्गावर मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक; आज घराबाहेर पडण्यापूर्वी वेळापत्रक बघा!

Maratha Reservation: उद्या नाशकात बंद नाही, पण, सरकारच्या निषेधार्थ....,

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2018 4:13 PM

आरक्षणाच्या मागणीसाठी गुरुवारी (दि. ९) सकल मराठा समाजाकडून राज्यभरात बंद पुकारला जाणार असल्याची चर्चा होती. याबाबत नाशिक जिल्ह्याच्या मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने संपूर्ण समाजाची बैठक बुधवारी (दि. ८) दुपारी झाली.

ठळक मुद्दे१८ नोव्हेंबरचा अखेरचा अल्टिमेटम

नाशिक : उच्च न्यायालयाच्या आदेशाचा आदर आणि कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी सकल मराठा समाज नाशिक शहरासह जिल्ह्यात कोठेही कोणत्याही प्रकारचा बंद पुकारणार नसल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले. नाशिककरांनी सोशल मीडियावरील बंद संदर्भातील अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.आरक्षणाच्या मागणीसाठी गुरुवारी (दि. ९) सकल मराठा समाजाकडून राज्यभरात बंद पुकारला जाणार असल्याची चर्चा  होती. याबाबत नाशिक जिल्ह्याच्या मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने संपूर्ण समाजाची बैठक बुधवारी (दि. ८) दुपारी झाली. या बैठकीत कुठल्याही प्रकारे शहरात व जिल्ह्यात बंद पुकारला जाणार नाही तसेच चक्का जाम आंदोलनही केले जाणार नाही, मोर्चे काढण्यात येणार नाही असे स्पष्ट करण्यात आले. शहरातील गंगापूररोडवरील डोंगरे वसतिगृह मैदानावर सकाळी दहा वाजेपासून मराठा बांधव आरक्षणाच्या मागणीसाठी एकत्र येतील आणि संध्याकाळपर्यंत ठिय्या आंदोलन करतील, असा ठराव बैठकीत घेण्यात आला. तालुका पातळीवर प्रत्येक तहसील कार्यालयासमोर केवळ ठिय्या आंदोलन समाजबांधव शांततेत लोकशाही मार्गाने करणार आहे. गावपातळीवर ग्रामपंचायत कार्यालयापुढे ठिय्या आंदोलनाचाही ठराव यावेळी सर्वांनुमते मंजूर करण्यात आला.सोशल मीडियावर बंदबाबत पसरविल्या जाणाऱ्या अफवांवर कुठल्याहीप्रकारे नागरिकांनी विश्वास ठेवू नये, असे आवाहन यावेळी करण्यात आले. सकल मराठा समाजाच्या वतीने जिल्हा पातळीवर हा निर्णय घेतला असून, नाशिक जिल्ह्यात कुठेही बंद पुकारला जाणार नाही असे सांगण्यात आले. बंद पूर्णत: रद्द करण्यात आला असला तरी सरकारपर्यंत मागणी पोहोचविण्यासाठी सरकारी कार्यालयांपुढे ठिय्या दिला जाणार आहे. जिल्हाधिकारी, तहसीलदार, ग्रामसेवक यांना आरक्षणाच्या मागणीचे निवेदन संध्याकाळी ठिय्या आंदोलनाच्या समाप्तीनंतर दिले जाणार आहे. बैठकीला माजी महापौर प्रकाश मते, चंद्रकांत बनकर, अ‍ॅड. श्रीधर माने, हंसराज वडघुले, सुनील बागुल, अर्जुन टिळे, करण गायकर, तुषार जगताप, योगेश कासवे या पदाधिकाºयांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.१८ नोव्हेंबरचा अखेरचा अल्टिमेटमस्वातंत्र्यदिनी राष्टध्वजाला मानवंदना दिल्यानंतर गावांमध्ये होणाºया ग्रामसभांमध्ये मराठा आरक्षणाबाबतचा ठराव मांडण्यात येणार असून, या सभेचा अहवाल सरकारपर्यंत पोहोचविला जाणार आहे. तसेच सरकारला १८ नोव्हेंबरपर्यंतचा अल्टिमेटम देण्यात आला आहे. तोपर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षणाबाबत सकारात्मक निर्णय न घेतल्यास जिल्ह्यात संपूर्ण सकल मराठा समाजाच्या वतीने चक्का जाम आंदोलन केले जाणार असल्याचेही बैठकीत यावेळी सांगण्यात आले.

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाNashikनाशिकmarathaमराठाMaratha Reservationमराठा आरक्षण