शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

माझ्या नादी लागाल तर याद राखा; नाशकात मनोज जरांगे पाटलांचा भुजबळांना सज्जड दम

By suyog.joshi | Updated: August 13, 2024 18:49 IST

नाशकात शांतता रॅलीचा समारोप, रॅलीनंतर सीबीएस चौकात उपस्थित मराठा समाज बांधवांना संबोधित करतांना जरांगे पाटील बोलत होते.

नाशिक - छगन भुजबळ यांनी शिवसेना फोडली, राष्ट्रवादी फोडली आता भाजप नेत्यांच्या मागे लागून मराठ्यांमध्ये भांडणं लावत आहे. यापुढे माझ्या नादी लागाल तर याद राखा, येवल्यात येऊन पराभूत करून दाखवू असा सज्जड दम मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी भुजबळ यांना भरला. मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी काढण्यात आलेल्या राज्यस्तरीय शांतता रॅलीचा समारोप मंगळवारी (दि. १३) नाशिकमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत झाला.

रॅलीनंतर सीबीएस चौकात उपस्थित मराठा समाज बांधवांना संबोधित करतांना जरांगे पाटील बोलत होते. यावेळी जरांगे पाटील म्हणाले, नाशिक जिल्ह्यातील मराठा समाजाने राज्याला दिशा दिली. कडवटपणा काय असतो तो नाशिकच्या समाजबांधवांनी शिकविला, मराठ्यांची कॉलर टाइट केली. मराठवाड्यापेक्षाही येथे एकजूट अधिक दिसून आली. कट्टरपणा काय असतो ते दाखवून दिले. यापुढे कोणत्याही नेत्यासाठी किंवा पक्षासाठी नव्हे तर जातीसाठी, आपल्या लेकरांसाठी लढायचे असा सल्लाही त्यांनी मराठा समाज बांधवांना दिला. मराठा समाजाच्या वेदना सरकारच्या लक्षात येत नाही. पक्षाला, नेत्याला बाप मानन्यापेक्षा जातीला बाप माना असा सल्ला दिला. जरांगे पाटील म्हणाले, निवडणूक आल्यावर भावनिक होवू नका. कोणीही नेता आपला नाही, पक्ष आपला नाही. आरक्षण मिळत नसल्याने आपली लेकरं बाळं मोठी होत नाही. वेळ आली की बदला घ्या असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

तब्येत ठिक नसतांनाही हजेरीमनोज जरांगे पाटील यांची तब्येत ठिक नसतांनाही ते शांतता रॅलीच्या समारोप सभेत सहभागी झाले. त्यांना डॉक्टरांनी १८ मिनिटांच्यावर भाषण करू नका असा सल्ला दिल्यानंतरही ते तब्बल ४५ मिनिटे व्यासपीठावर बोलले. व्यासपीठावर बोलत असतांना त्यांना अचानक बसून बोलण्याची इच्छा झाली. परंतु ते बसू शकले नाही. त्यांच्या कमरेतही वेदना होत असल्याचे दिसून येत होते. उपोषणामुळे माझे अंग गळून गेले आहे. फारशी ताकद राहिली नसल्याचेही त्यांनी सांगितले. शेवटी त्यांनी भाषण आटोपते घेतले. डॉक्टरांच्या सल्याने ते थेट आंतरवली सराटीत जावून ॲडमिट होणार असल्याचे त्यांनी सभेत सांगितले.

२९ ला ठरवू लढायचं की पाडायचं !येत्या २९ ऑगस्ट रोजी आंतरवली सराटीत सर्व समाजबांधवांनी यावे. त्या ठिकाणी आपण विधानसभा निवडणूक लढायची की उमेदवारांना पाडायचे असा निर्णय घेऊ असे जरांगे पाटील यांनी सभेत आवाहन केले.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलChhagan Bhujbalछगन भुजबळDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४