शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
2
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
3
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
4
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
5
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
6
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
7
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
8
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
9
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
10
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
11
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
12
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
13
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
14
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
15
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
16
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
17
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
18
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
19
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
20
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

अनेक गावे वंचित : धान्य वितरण व्यवस्था कोलमडल्याने गरिबांची गैरसोय

By admin | Updated: February 27, 2015 22:45 IST

धान्य घोटाळ्याचा दिंडोरीला फटका

दिंडोरी : सुरगाणा तालुक्यात स्वस्त धान्याचा करोडोचा घोटाळा उघडकीस येऊन त्यात तहसीलदारासह वाहतूक ठेकेदारास झालेल्या अटकेचा फटका दिंडोरी तालुक्यातील गोरगरीब जनतेला बसला असून, ऐन सणासुदीत वितरण व्यवस्था कोलमडल्याने रेशनविना महागडे धान्य घ्यावे लागत आहे. दिंडोरी शहरासह अनेक गावे या महिन्यात रेशनपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.दिंडोरी तालुका हा आदिवासी तालुका म्हणून ओळखला जातो. या तालुक्यातील अनेक कुटुंबे या स्वस्त धान्यावर अवलंबून आहेत. परंतु या महिन्यात धान्यच वितरित न झाल्याने या कुटुंबांवर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. मात्र याकडे लोकप्रतिनिधींनी पाठ फिरविल्याने नागरिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. येथील नागरिक रोज धान्य दुकानात जाऊन धान्य आले का याची विचारणा करतात व धान्य न आल्याने त्यांना रिकाम्या हाती माघारी परतावे लागत आहे. शिवाय पुढील चार दिवसांवर येऊन ठेपलेल्या होळी सणालाच स्वस्त धान्य न आल्याने येथील गोरगरीब जनतेला सण कसा साजरा करावा याची चिंता लागली आहे. एकीकडे पाच कोटी रुपयांचा स्वस्त धान्य घोटाळा होतो, तर दुसरीकडे स्वस्त धान्य मिळत नसल्याने गरीब जनतेवर उपासमारीची वेळ आली आहे, असे चित्र सध्या तालुक्यात बघायला मिळत आहे. स्वस्त धान्य दुकानांत धान्यच शिलक नसल्याने दुकानांच्या बाहेर धान्य आलेले नाही असा फलक लावला जात आहे.मागील पंधरवड्यात सुरगाणा येथे झालेल्या पाच कोटी रुपयांच्या धान्य घोटाळ्यामुळे तालुक्यात धान्य वितरण करणारी वाहतूक थांबली आहे. रोज सहा वाहने धान्य वितरित केले जात होते; मात्र आता फक्त दोन वाहनांद्वारे वितरण होत आहे. वाहनेच उपलब्ध नसल्याने दुकानदारांना धान्य उपलब्ध होत नाही. त्यामुळे स्वस्त धान्य दुकानांत धान्यच शिल्लक राहिले नाही. त्यातच पुन्हा पुरवठा विभागातील हमालांनी वेतनवाढ व करारासाठी पुकारलेल्या संपामुळे वितरण व्यवस्था कोलमडून पहिल्यांदाच पूर्ण महिना धान्याविना अनेक दुकाने बंद आहेत. (वार्ताहर)