रस्ताकाम करताना केबल तुटल्याने गावातील अनेकांचे संपर्कही तुटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2019 17:47 IST2019-11-18T17:46:13+5:302019-11-18T17:47:29+5:30
पांडाणे : वणी ते घागबारी चौपदरी करणाचे काम सुरु असतांना असून अडचन, नसून खोळबा असे म्हणण्याची वेळ जिओ व बीएसएन एलवर वेळ आली आहे.

बीएसएनएलची केबल रस्ता चौपदरी करण्यासाठी जेसीबीच्या सहाय्याने तुटल्यामुळे बीएसएनएल अधिकारी एस. डी. ईगणोरे, तुपे व मजूर काम करताना.
पांडाणे : वणी ते घागबारी चौपदरी करणाचे काम सुरु असतांना असून अडचन, नसून खोळबा असे म्हणण्याची वेळ जिओ व बीएसएन एलवर वेळ आली आहे.
पांडाणे गावाजवळ असलेल्या देवनदीपासून ते पुणेगाव फाटया पर्यत रस्त्याचे चौपदरी करण चालू असल्यामुळे दोन्ही बाजूला जेसीबीच्या सहाय्याने खोदकाम सूरू असून जे रस्त्याच्या खोदकामासाठी जेसीबी आॅपरेटर आहेत. त्यांना कोणत्या साईडला दुरध्वनीच्या किंवा भ्रमणध्वनीच्या केबल आहेत ते माहीत नसून जेसीबीवाल्यांचे जोरात काम चालू असतांना त्यामध्ये दोघी कंपनीच्या केबल तुटल्याने बीएसएनएलचे अधिकारी यांनी देवनदीपासून ते पांडाणे ग्रामपंचायत पर्यत दुरध्वनीची व भ्रमणध्वनीची केबल बाहेरून टाकून असून अडचन नसून खोळबा म्हणण्याची वेळ आली आहे.
गेल्या पंधरा दिवसापासून जिओची केबल तुटल्यामुळे दुरुस्तीसाठी संबंधित विभागाचे अधिकारी झटत असून ज्या ठिकाणी वायरडॅमेज झाली आहे. त्या ठिकाणी चेंबर टाकून त्यात केबल ठेवली जात आहे.