शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
2
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
3
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
4
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
5
जर्मनीत अंतराळवीरांना १०० दिवसांचा एकांतवास! त्यांनी काही मोठा गुन्हा केला आहे का?
6
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
7
बापरे, हा काय प्रकार! हाय हिल्स घालून अक्षय कुमारचा 'लालपरी' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल
8
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
9
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
10
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
11
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
12
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
13
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
14
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
15
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
16
जांभळाला सोन्याचा भाव, किरकोळमध्ये ५०० रुपये किलो; ३०० ते ४०० रुपयांचा घाऊक बाजारात भाव
17
९० वर्षीय वृद्धेच्या मानहानी दाव्यावर थेट २० वर्षांनी २०४६ मध्ये सुनावणी; हायकोर्टात काय घडलं?
18
नेदरलँडवरून कुरियरने विनाअडथळा उल्हासनगरमध्ये पोहोचले पार्टी ड्रग्ज; नायजेरियन टोळीचे कनेक्शन
19
ठाण्यातील १०० एकरच्या TDR ला अखेर स्थगिती, सुप्रीम कोर्टाचा निर्णय; २,८०० कोटींचा व्यवहार रखडला
20
दुसऱ्या संधीच्या सीईटीसाठी ९ ते २१ मे दरम्यान परीक्षा; ४ लाख ९२ हजार विद्यार्थी परीक्षेला बसणार
Daily Top 2Weekly Top 5

विजयातून अनेकांना मिळाला ‘धडा’

By admin | Updated: February 26, 2017 23:29 IST

प्रवीण आडके : देवळाली कॅम्प एकलहरे गटातून बंडखोर शंकर धनवटे यांच्या विजयाकडे निव्वळ विजय म्हणून पाहता येणार नाही तर शिवसेना हरली आणि शिवसैनिक जिंकले असेच म्हणावे लागेल.

प्रवीण आडके : देवळाली कॅम्पएकलहरे गटातून शिवसेनेचे बंडखोर शंकर धनवटे यांच्या विजयाकडे निव्वळ विजय म्हणून पाहता येणार नाही तर याच गटात खासदारपुत्र अजिंक्य गोडसे यांचा पराभव त्यांनी केल्याने शिवसेना हरली आणि शिवसैनिक जिंकले असेच म्हणावे लागेल. खासदार हेमंत गोडसे यांचे चिरंजीव अजिंक्य गोडसे यांना शिवसेनेचे जिल्हा परिषद निवडणुकीचे तिकीट जाहीर होताच सेनेचेच शंकर धनवटे समर्थकांमध्ये नाराजी पसरली होती. धनवटे यांचे तिकीट मुद्दाम कापण्यात आले, असा आरोप करीत एकलहरा गावातील धनवटे समर्थकांनी गाव बंद करून एकप्रकारे आपली नाराजी दर्शविली होती.  पक्षीय कामकाज करूनही तिकीट न मिळाल्याने नाराज झालेल्यांनाही पक्षाने विचारले नाही. परिणामी नाराज शिवसैनिकांच्या बळावर धनवटे यांनी अपक्ष उमेदवारी केली आणि गोडसे यांना आव्हानच दिले. धनवटेंसोबत काही सेनेचे पदाधिकारी, नातेगोते आणि मित्रपरिवार होताच; त्यातच माजी खासदार राजाभाऊ गोडसे हे धनवटे यांच्याबरोबरीने उभे राहिल्याने कार्यकर्त्यांना बळ मिळाले आणि कार्यकर्ते कामाला लागले. निष्ठावंतांना डालण्याच्या भावनेतूनच सारे सैनिक एकवटले आणि त्याचा परिणाम विजयात परावर्तीत झाला. धनवटे यांनी अपेक्षेप्रमाणे एकलहरा गणातून २७९६ मतांची आघाडी घेऊन विजय निश्चित केला होता. लहवित गणातून सरासरी बेलतगव्हाण या दोन गावांसह अजिंक्यला फक्त सात मतदान केंद्रांत आघाडी घेता आली. लहवित गणात गोडसे यांना ४८९२ तर धनवटे यांना ४०५५ असे मते पडली. या गणात गोडसे यांनी ८३७ मतांची आघाडी घेतली मात्र आघाडी कायम राहू शकली नाही. याउलट धनवटे यांनी लहवित गणात १३ मतदान केंद्रावर निर्णायक आघाडी घेतली. ज्ञानेश्वर गायकवाड यांनी लहवित गावात अपेक्षेप्रमाणे २६३१ मते घेतली याचाच फायदा धनवटे यांना झाला. एकलहरा गणात सरपंच अनिल जगताप हे पहिल्यापासून धनवटे यांच्यासोबतच राहिले.  या गणात राष्ट्रवादीचे बाळासाहेब म्हस्के, शिवसेनेचे सचिन जगताप यापैकी एकाचा विजय निश्चित मानला जात होता. मात्र धनवटे फॅक्टरने इतरांचे मनसुबे कोलमडून पडले. लहवित गावातच तीन उमेदवार असल्याने तसेच डॉ. मंगेश सोनवणे यांचा दांडगा संपर्क असल्याने धनवटे गटाच्या ज्योती मोरे यांना कमी मते मिळाली.