शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

'म्हाडा'च्या फसवणूकप्रकरणी मनवानीला अटक; काही बिल्डरांनाही अटक होण्याची शक्यता, दोन नायब तहसीलदारांची चौकशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2026 15:47 IST

Mhada land fraud Case: नाशिकमध्ये म्हाडाची फसवणूक करण्यात आल्याच्या प्रकरणात पोलिसांनी मुख्य आरोपीला बेड्या ठोकल्या. या प्रकरणात बिल्डर आणि इतरांनाही अटक होण्याची शक्यता आहे. 

नाशिकमध्ये 'म्हाडा'मार्फत गरिबांसाठी घरे देण्याच्या योजनेत म्हाडाची फसवणूक केल्याप्रकरणी मुख्य संशयित आरोपी सोनू मनवानी याला रविवारी (दि. १५) मध्यरात्री अटक करण्यात आली. सोमवारी (१६ मार्च) त्याला न्यायालयात हजर केले असता, १९ मार्चपर्यतची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. या प्रकरणाचा तपास सरकारवाडा पोलिसांकडून गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात येणार आहे. चौकशीत अनेक बड़े मासे गळाला लागणार असल्याची दाट शक्यता पोलिस सूत्रांनी व्यक्त केली आहे.

या प्रकरणात सहा विकासकांसह, दोन सेवानिवृत्त नायब तहसीलदार, तीन तलाठी, तसेच शासकीय सेवेतील अन्य तीन कर्मचाऱ्यांची चौकशी झाली असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरेश आव्हाड यांनी दिली. अटकेच्या भीतीने संशयितांपैकी काही विकासक तसेच जमिन मालक नॉट रिचेबल झाले आहेत.

म्हाडा मार्फत गरिबांना घरे देण्याऐवजी जमीनीचे तुकडे करून फसवणूक केल्याप्रकरणी ४९ विकासकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. त्यानंतर महापालिकेने जागा मालक आणि भागीदारांमधील नावे १९४ वर गेली आहे. या घडामोडीनंतर पोलिसांनी तपासाला वेग दिला आहे.

रविवारी (१५ मार्च) शहरातील काही विकासक तसेच त्यांच्या भागीदारांची कसून चौकशी करण्यात आल्यानंतर सोमवारी तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात येणार आहे. त्यानुसार चौकशीचे कागदपत्र गुन्हे शाखेकडे सोपविण्यात येणार आहे.

सोमवारी झालेल्या युक्तिवादात वरिष्ठ पोलिस निरीक्षक आव्हाड यांनी गरिबांसाठी घरे देण्याच्या योजनेत फसवणूक झाल्याचे कागदपत्रांच्या पडताळणीत आढळून आले आहे. तपास अद्याप बाकी असल्याने सोनू मनवानी यांना जामीन देऊ नये, अशी बाजू मांडली. 

बिल्डरांना अटकेची शक्यता

कागदपत्राची छाननी सुरू असताना शहरातील अनेक बड्या विकासकांच्या निवासस्थानी जाऊन पोलिसांनी सोमवारी देखील चौकशी केली. यात काही भागीदारांचाही समावेश आहे. येत्या काही दिवसात आणखी काही विकासकांना अटक होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

एक एकरपेक्षा अधिक क्षेत्र असलेल्या भूखंडापैकी २० टक्के क्षेत्र म्हाडाला गरिबांना घरे देण्यासाठी द्यावे लागते. मात्र, हे क्षेत्र म्हाडाला द्यावे लागू नये यासाठी एक एकर पेक्षा कमी क्षेत्र होईल असे तुकडे करून लेआऊट केले. काहींनी हे भूखंड विकुनही टाकले असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले.

...अन् संशयिताचा स्वच्छता गृहातही शोध

रविवारी रात्री पोलिसांनी अनेक विकासकांच्या घरी धडक दिली. यातील अनेकजण बाहेरगावी गेल्याचे सांगण्यात आले. एक विकासक घराच्या स्वच्छतागृहात गेल्याचे कळल्यावर पोलिसांनी तेथेही धाव घेतली मात्र, तो तेथे नव्हता. दरम्यान काही संशयित विकासक नाशकातून गायब झाले आहे. तर काहींचे फोन स्विच ऑफ आहेत.

जामीन अर्ज फेटाळले

काही विकासकांनी अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केले होते, मात्र ते फेटाळले गेल्याचे समजते. त्यामुळे आता अन्य विकासकांनादेखील वरिष्ठ न्यायालयात धाव घ्यावी लागण्याची शक्यता आहे. तसेच आता संबंधित विकासकांचे वास्तुविशारदही पोलिसांच्या रडारवर आहेत.

पुन्हा तपासाचा ससेमिरा

पोलिसांनी गेल्या दोन दिवसांत शासकीय सेवेतील ज्या काही सरकारी कर्मचाऱ्यांची, तसेच विकासकांची चौकशी केली त्यांना पुन्हा स्थानिक गुन्हे शाखेसमोर चौकशीला सामोरे जाऊ शकते. यात नावांची जुळवाजुळव पोलिस पथक करणार आहे. त्यामुळे आता सरकारी यंत्रणाही रडारवर आल्याचे दिसत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : MHADA Fraud: Manwani Arrested, Builders Likely, Officials Under Investigation

Web Summary : S. Manwani arrested in Nashik MHADA fraud case. Builders may also face arrest; officials investigated. Land irregularities uncovered in housing scheme.
टॅग्स :mhadaम्हाडा लॉटरीLand Buyingजमीन खरेदीCrime Newsगुन्हेगारीNashikनाशिकPoliceपोलिस