नाशिकमध्ये मनोरूग्णाचा कुऱ्हाडीने हल्ला; तिघांचा मृत्यू तर 5-6 जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2017 11:17 IST2017-09-12T11:08:46+5:302017-09-12T11:17:17+5:30

नाशिकमध्ये एका मनोरूग्णाने काही जणांवर हल्ला केल्याची घटना घडली आहे.

Manushu attacked in Nashik by Kurhadi; Three killed and 5-6 others injured | नाशिकमध्ये मनोरूग्णाचा कुऱ्हाडीने हल्ला; तिघांचा मृत्यू तर 5-6 जण जखमी

नाशिकमध्ये मनोरूग्णाचा कुऱ्हाडीने हल्ला; तिघांचा मृत्यू तर 5-6 जण जखमी

ठळक मुद्दे नाशिकमध्ये एका मनोरूग्णाने काही जणांवर हल्ला केल्याची घटना घडली आहे.नांदगाव तालुक्यातील हिंगण देहरे गावात हा प्रकार घडला आहे.मानसिक रुग्णाच्या हल्ल्यात तीन जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

नाशिक, दि. 12- नाशिकमध्ये एका मनोरूग्णाने काही जणांवर कुऱ्हाडीने हल्ला केल्याची घटना घडली आहे. नांदगाव तालुक्यातील हिंगण देहरे गावात हा प्रकार घडला आहे. मानसिक रुग्णाच्या हल्ल्यात तीन जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. नांदगाव तालुक्यातील हिंगण देहरे गावात मानसिक रुग्ण असलेल्या व्यक्तीने आज सकाळी नऊ ते साडेनऊच्या सुमारास लोकांवर कुऱ्हाडीने वार केले. या हल्ल्यात तीन जणांचा मृत्यू झाला तर 5 ते 6 जण जखमी आहेत.

जखमींना नांदगाव इथल्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून मानसिक रुग्णाला ताब्यात घेण्यात आलं आहे. तो खरंच मनोरुग्ण आहे की नाही याचा पोलिस तपास करत आहेत. या गावात यापूर्वीही अशी घटना घडल्या असल्याचं गावकऱ्यांचं म्हणणं आहे. पण आजच्या प्रकारामुळे हिंगण देहरे गावात खळबळ उडाली आहे.

Web Title: Manushu attacked in Nashik by Kurhadi; Three killed and 5-6 others injured