उमराळे बुद्रुक येथे मनोरुग्ण मुलाने केला वडिलांचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2019 01:00 IST2019-04-13T00:59:55+5:302019-04-13T01:00:12+5:30

दिंडोरी : तालुक्यातील उमराळे बुद्रुक येथील मनोरुग्ण मुलाने आपल्या वडिलांचा खून केला असून, खून केल्यानंतर त्याने स्वत:ला मारहाण करून घेतली त्याला जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.

 Manoraguna's son killed father in Umrele Budruk | उमराळे बुद्रुक येथे मनोरुग्ण मुलाने केला वडिलांचा खून

उमराळे बुद्रुक येथे मनोरुग्ण मुलाने केला वडिलांचा खून

ठळक मुद्दे आई व भावजय योगीता पवार यांनाही मारहाण केली.

दिंडोरी : तालुक्यातील उमराळे बुद्रुक येथील मनोरुग्ण मुलाने आपल्या वडिलांचा खून केला असून, खून केल्यानंतर त्याने स्वत:ला मारहाण करून घेतली त्याला जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.
उमराळे बुद्रुक येथील मयत रमेश नामदेव पवार (५०) यांचे कुटुंब चाचडगाव येथील राहुल चव्हाण यांच्या शेतात शेतमजुरी म्हणून काम करतात. त्यांच्या कुटुंबातील सागर रमेश पवार (२७) हा मोठा मुलगा मनोरुग्ण असल्याने त्याच्यावर बऱ्याच दिवसांपासून खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते; परंतु तो औषधे घेत नव्हता, त्याऐवजी बुवाबाबाकडे जात होता. तो आपल्या घरातील आई, वडील, भावजय यांना मारहाण करीत असे. गुरुवारी (दि.११) रात्री ८.३० वाजता सागर पवार या मनोरु ग्ण मुलाने आपले वडील रमेश नामदेव पवार यांना मारहाण सुरू केली. लाकडी दांड्याने डोक्यात जबर मारहाण केल्याने रमेश नामदेव पवार हे गतप्राण झाले. त्याचसोबत आई व भावजय योगीता पवार यांनाही मारहाण केली.
याबत आरोपीच्या भावजई योगीता समीर पवार (२०) यांनी दिंडोरी पोलीस स्टेशन ला फिर्याद दिली आहे. याबाबत दिंडोरी पोलीस स्टेशन मध्ये खुनाचा गुन्हा दाखल केला असून आरोपी रमेश पवार हा जखमी असल्याने नाशिक रु ग्णालयात उपचार घेत आहे.

Web Title:  Manoraguna's son killed father in Umrele Budruk