मनमाडला बहिणीच्या हातून मद्यपी भावाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2022 01:47 IST2022-04-27T01:47:15+5:302022-04-27T01:47:38+5:30

मनमाड शहरातील विवेकानंद नगर क्र. २ मध्ये मद्याच्या नशेत भावाने बहिणीला शिवीगाळ केल्यामुळे आलेल्या रागातून बहिणीने भावाला चाकूचा धाक दाखविला. मात्र, त्यात चुकून भावाच्या शरीराला धारदार चाकू लागल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. यामुळे संदीप ऊर्फ बाळू भगवानराव गोंगे (४५) याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. त्यानंतर स्वतःहून पोलीस स्थानकात जाऊन बहिणीने गुन्ह्याची कबुली दिली.

Manmadla murdered by his sister at the hands of his sister | मनमाडला बहिणीच्या हातून मद्यपी भावाचा खून

मनमाडला बहिणीच्या हातून मद्यपी भावाचा खून

मनमाड : शहरातील विवेकानंद नगर क्र. २ मध्ये मद्याच्या नशेत भावाने बहिणीला शिवीगाळ केल्यामुळे आलेल्या रागातून बहिणीने भावाला चाकूचा धाक दाखविला. मात्र, त्यात चुकून भावाच्या शरीराला धारदार चाकू लागल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. यामुळे संदीप ऊर्फ बाळू भगवानराव गोंगे (४५) याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. त्यानंतर स्वतःहून पोलीस स्थानकात जाऊन बहिणीने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून, खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

 

             याबाबतची माहिती अशी की , शोभा गारुडकर (५५), रा. श्रीरामपूर आणि संदीप ऊर्फ बाळू गोंगे, रा. विवेकानंद नगर, मनमाड हे बहीणभाऊ आहेत. शोभा यांच्या मुलीचे १५ एप्रिल रोजी मनमाड येथे निधन झाले. त्यामुळे शोभा या मनमाडमध्ये माहेरी आल्या होत्या. भाऊ संदीप ऊर्फ बाळू हा मद्यपान करतो. मंगळवारी दुपारी तो मद्यपान करून घरात आला व बहिणीस शिवीगाळ करू लागला, असा प्रकार नेहमीच होत असे. या कृत्याचा बहिणीला राग आला. तिने भावाला धाक दाखविण्यासाठी चाकू घेतला. त्याचवेळी सदर चाकू संदीप ऊर्फ बाळू याच्या पोटात आरपार घुसला. यामुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने त्याचा मृत्यू झाला.

आपल्या हातून भावाचा खून झाल्यामुळे गारुडकर यांनी थेट पोलीस स्थानक गाठून घडलेला प्रकार सांगितला. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. सदरप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून, प्रभारी पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते हे तपास करीत आहेत.

Web Title: Manmadla murdered by his sister at the hands of his sister