मनमाडला ‘दी बर्निग ट्रक’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2020 01:09 IST2020-10-05T22:29:59+5:302020-10-06T01:09:48+5:30
मनमाड: शहरातून जाणाऱ्या इंदूर पुणे महामार्गावर भरधाव वेगात जाणाºया मालट्रकने अचानक पेट घेतला.

मनमाडला ‘दी बर्निग ट्रक’!
ठळक मुद्देसांगली येथून पंजाबकडे जात असलेला हा ट्रक
मनमाड: शहरातून जाणाऱ्या इंदूर पुणे महामार्गावर भरधाव वेगात जाणाºया मालट्रकने अचानक पेट घेतला. सांगली येथून पंजाबकडे जात असलेला हा ट्रक शहरातील मालेगाव चौफुलीच्या पुढे गेल्या नंतर धुर निघत असल्याचे चालकाच्या निदर्शनास आले. या बाबद माहिती मिळताच पालिकेच्या अग्नीशमन दलाने तात्काळ घटनास्थळी भेट घेउन आगीवर नियंत्रण मिळवले. आगीचे कारण समजू शकले नाही. सुदैवाने यामध्ये कुठलीही जीवीत हानी झाली नाही.