मनमाडला शहर हरवले धुक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2022 00:35 IST2022-01-24T00:35:15+5:302022-01-24T00:35:32+5:30
उत्तराखंड येथे होत असलेल्या हिमवृष्टीचा परिणाम शहर परिसरामध्ये देखील दिसून आला. सकाळपासून परिसरामध्ये धुक्याची चादर पसरल्याने वाहनधारकांची तारांबळ उडाली. दिवसभर आणि रात्री शीतवारे सुरू असल्याने अनेक नागरिकांनी घरातच राहणे पसंद केले, तर सूर्यदर्शन हे दुपारनंतर अवघे १५ मिनिटांसाठी झाले.

मनमाडला शहर हरवले धुक्यात
मनमाड : उत्तराखंड येथे होत असलेल्या हिमवृष्टीचा परिणाम शहर परिसरामध्ये देखील दिसून आला. सकाळपासून परिसरामध्ये धुक्याची चादर पसरल्याने वाहनधारकांची तारांबळ उडाली. दिवसभर आणि रात्री शीतवारे सुरू असल्याने अनेक नागरिकांनी घरातच राहणे पसंद केले, तर सूर्यदर्शन हे दुपारनंतर अवघे १५ मिनिटांसाठी झाले.
शहर परिसरात दिवसभर अंगाला झोंबणारा गार वारा, ढगाळ पावसाळी वातावरण आणि प्रचंड धुके असे विचित्र वातावरण रविवारी सकाळपासून होते. या वातावरणाचा जबरदस्त फटका बाजारपेठेला बसला आणि दिवसभर असलेल्या गारठ्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळले. त्यामुळे बाजारपेठेमध्ये शुकशुकाट दिसून आला. रविवारी पहाटेपासून दाट धुक्याने मनमाडला वेढून घेतले होते. धुक्याची चादर दिवसभर कायम होती .अधुन-मधून सूर्यप्रकाश दिसत होता. पण त्याची तीव्रता अत्यंत कमी होती. मात्र गार अंगाला झोंबणारे वारे वाहत होते. त्यामुळे गारठा चांगलाच पसरला. त्याचा परिणाम शहरातील जनजीवन विस्कळीत झाले. नागरिकांना दिवसभर गरम कपडे घालून वावरावे लागले .पहाटेच्यावेळी आणि मंद गार वारा यामुळे थोडेसे अल्हाददायक वातावरण निर्माण झाले खरे, पण हे वातावरण दिवसभर कायम असल्याने नागरिक मात्र या संमिश्र आणि विचित्र वातावरणामुळे हैराण झाले होते.