मना देशनी बात शे न्यारी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:18 IST2021-08-15T04:18:05+5:302021-08-15T04:18:05+5:30
नाशिक : स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून गोकुळ पाटील यांच्या संकल्पनेतून जी. पी. प्रोडक्शन या यू ट्युब चॅनेलसाठी ‘मना देश ...

मना देशनी बात शे न्यारी !
नाशिक : स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून गोकुळ पाटील यांच्या संकल्पनेतून जी. पी. प्रोडक्शन या यू ट्युब चॅनेलसाठी ‘मना देश नी बात शे न्यारी’ हे खान्देशच्या अहिराणी भाषेतील पहिले अहिराणी गीत तयार करण्यात आले होते. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने या गीताचे बोल खान्देशवासीयांच्या मनात रुंजी घालू लागले आहेत.
नाशिकचे कलाकार गोकुळ पाटील यांच्या मनात या गीताबाबतची संकल्पना आली. खान्देशवासीयांसाठी या गीतातून काहीतरी वेगळे देण्याची संकल्पना मनात आली असता खान्देशातील कलाकार एकत्र घेऊन व्हिडिओ तयार करण्याचा विचार त्यांनी केला. त्यासाठी महाराष्ट्राची हास्यजत्राचे निर्माते सचिन गोस्वामी यांच्यासमोर प्रस्ताव दिला असता त्यांनी स्वखुशीने मदत करायची तयारी दाखवली. त्यानंतरच खऱ्या अर्थाने चित्रीकरणाला सुरुवात झाली. या व्हिडिओमध्ये स्वतः सचिन गोस्वामी यांनी तसेच महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमामधील विनोदी कलाकार शाम राजपुत, खान्देश सुपरस्टार सचिन कुमावत, अहिराणी बोली भाषेतील पहिले चित्रपट निर्माते ईश्वर माळी, निर्माते चेतन गरुड, नवीन पिढीतील कलाकार विनोद कुमावत, भय्या मोरे, अभिनेत्री शीतल अहिरराव, कविता बनसोडे, पूनम पाटील तसेच अश्विनी गोस्वामी अशा खान्देशच्या कलाकारांनी अभिनय केला असून दिग्दर्शन अश्विनी गोस्वामी यांनी केले आहे. या गीतासाठी गायन अभिजीत कोसंबी, मीना पाटील यांनी केले असून संगीत संयोजन अभिजीत शर्मा, कन्हैया खैरनार यांनी केले आहे.
छायाचित्रण आणि संकलन रोहित खुळे यांचे तर निर्मिती गोकुळ पाटील यांची आहे.