नाशिक कुंभात ममता कुलकर्णी किन्नर आखाड्यासोबतच आचार्य महामंडलेश्वरांचे स्पष्टीकरण : त्र्यंबकमध्येच असेल आखाडा

By संकेत शुक्ला | Updated: March 24, 2025 21:57 IST2025-03-24T21:56:45+5:302025-03-24T21:57:33+5:30

कुंभमेळासंदर्भात आखाड्यातील सदस्यांशी चर्चा करण्यासाठी सोमवारी (दि. २४) नाशिक येथे आले असता माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केले.

Mamta Kulkarni along with Kinnar Akhara in Nashik Kumbh, Acharya Mahamandaleshwar's explanation: Akhara will be in Trimbak itself | नाशिक कुंभात ममता कुलकर्णी किन्नर आखाड्यासोबतच आचार्य महामंडलेश्वरांचे स्पष्टीकरण : त्र्यंबकमध्येच असेल आखाडा

नाशिक कुंभात ममता कुलकर्णी किन्नर आखाड्यासोबतच आचार्य महामंडलेश्वरांचे स्पष्टीकरण : त्र्यंबकमध्येच असेल आखाडा

संकेत शुक्ल

नाशिक :
प्रयागराज येथे नुकत्याच झालेल्या कुंभमेळ्यात अभिनेत्री ममता कुलकर्णी हिचा किन्नर आखाड्यात सहभाग आणि पदवी प्रदान सोहळ्यावरून झालेला वाद ताजा असतानाच नाशिक येथील कुंभात ममता कुलकर्णीचा किन्नर आखाड्यात सहभाग असेल, असे आखाड्याच्या प्रमुख आचार्य महामंडलेश्वर लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांनी स्पष्ट केले आहे.

कुंभमेळासंदर्भात आखाड्यातील सदस्यांशी चर्चा करण्यासाठी सोमवारी (दि. २४) नाशिक येथे आले असता माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केले. त्र्यंबकेश्वर येथेच आमचा आखाडा असेल. त्यातच ममता आमच्यासोबत असतील. काही जरांनी विनाकारण हा वाद निर्माण केला आहे. त्याची गरज नव्हती. आमच्या आखाड्याला त्र्यंबकेश्वरी जागा देण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली असून आम्ही त्र्यंबक येथील कुंभात पहिल्यांदाच सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कुंभमेळा नाशिक नावानेच ओळखला जावा

त्र्यंबक नाशिक हा वाद सुरू असताना जिल्हा नाशिक असल्याने येथील कुंभमेळा नाशिक या नावानेच ओळखला जावा, असे मतही लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांनी व्यक्त केले.

Web Title: Mamta Kulkarni along with Kinnar Akhara in Nashik Kumbh, Acharya Mahamandaleshwar's explanation: Akhara will be in Trimbak itself

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक