शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

ममदापूर राखीव संवर्धन : वन्यजीवांची तृष्णा भागविण्यासाठी प्राणीप्रेमींची धाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2019 14:58 IST

मुक्या जीवांची तृष्णा भागावी जेणेकरून दुष्काळाचे ते बळी ठरू नयेत आणि वन्यजीवप्रेमी म्हणून आपले कर्तव्याची जाणीव ठेवून इको-एको फाउण्डेशनच्या स्वयंसेवकांनी आपआपसांत वर्गणी गोळा करून ममदापूर-राजापूर राखीव संवर्धन क्षेत्रातील कोरडेठाक झालेले पाणवटे पाण्याने भरण्याचा उपक्रम हाती घेतला.

ठळक मुद्देकोरडेठाक झालेले पाणवटे पाण्याने भरण्याचा उपक्रम आगळीवेगळी गुढी उभारून रविवारी (दि.७) संवर्धन क्षेत्र गाठले. उपक्रम पहिल्या पावसापर्यंत सातत्याने राबविण्याचा मानस

नाशिक : जिल्ह्यातील येवला तालुक्यात माणसांना पिण्याच्या पाण्याची भ्रांत पडली असून उन्हाची तीव्रता अन् पाण्याचे दुर्भिक्ष्यामुळे येथील मुक्या जीवांची जीवाची काहिली होत आहे. वन्यजीवांच्या तृष्णेची जाणीव शहरातील ‘इको-एको फाउण्डेशन’च्या स्वयंसेवकांना झाली आणि त्यांनी भूतदयेतून का होईना, या स्वयंसेवकांनी ममदापूर राखीव वन संवर्धन क्षेत्रातील कोरडेठाक पाणवठे भरण्यासाठी पुढचे पाऊल टाकले आहे.

कथीत वन्यजीवप्रेमी, पर्यावरणप्रेमी, निसर्गप्रेमींची संख्या कमी नाही. यामुळे जे खरेखुरे प्रामाणिकपणे ‘प्रेमी’चे कर्तव्य बजावतात, त्यांच्याकडेदेखील समाजाचा बघण्याचा दृष्टीकोन बदलतो आणि तसे होणे स्वभाविकही आहे. मुक्या जीवांची तृष्णा भागावी जेणेकरून दुष्काळाचे ते बळी ठरू नयेत आणि वन्यजीवप्रेमी म्हणून आपले कर्तव्याची जाणीव ठेवून इको-एको फाउण्डेशनच्या स्वयंसेवकांनी आपआपसांत वर्गणी गोळा करून ममदापूर-राजापूर राखीव संवर्धन क्षेत्रातील कोरडेठाक झालेले पाणवटे पाण्याने भरण्याचा उपक्रम हाती घेतला.गुढीपाडव्याच्या दिवशी या स्वयंसेवकांनी ही आगळीवेगळी गुढी उभारून रविवारी (दि.७) संवर्धन क्षेत्र गाठले. या भागात पाण्याच्या टॅँकरची आगाऊ नोंदणी करून घेत स्वयंसेवकांनी पाणवटे भरण्यास सुरूवात केली. पहिल्या टप्प्यात दोन पाणवटे उभारलेल्या निधीतून भरणे शक्य झाल्याचे अभिजीत महाले यांनी सांगितले; मात्र समाजातील दानशुरांनाही सोशलमिडियाच्या माध्यमातून आवाहन करण्यात आले आहे. मे अखेरपर्यंत या भागातील पाणवटे संस्थेने दत्तक घेतले असून हा उपक्रम पहिल्या पावसापर्यंत सातत्याने राबविण्याचा मानस महाले यांनी व्यक्त केला.

टॅग्स :wildlifeवन्यजीवNashikनाशिकforest departmentवनविभागwater shortageपाणीटंचाईwater transportजलवाहतूकdroughtदुष्काळ