मामाला भाचाने पलंगावरून उचलून आपटले; खूनाच्या गुन्ह्यात पंचवटी पोलिसांनी ठोकल्या बेड्या

By अझहर शेख | Published: December 17, 2023 06:34 PM2023-12-17T18:34:01+5:302023-12-17T18:34:13+5:30

नाशिक : मामाने भाचाला त्याच्या मुलाला दवाखान्यात मुलाला दाखवायला पैसे नाही, दारू प्यायला पैसे आहेत, असे सांगितल्याचा राग मनात ...

Mama was picked up from the bed by her nephew. Panchavati police put shackles in the crime of murder | मामाला भाचाने पलंगावरून उचलून आपटले; खूनाच्या गुन्ह्यात पंचवटी पोलिसांनी ठोकल्या बेड्या

मामाला भाचाने पलंगावरून उचलून आपटले; खूनाच्या गुन्ह्यात पंचवटी पोलिसांनी ठोकल्या बेड्या

नाशिक: मामाने भाचाला त्याच्या मुलाला दवाखान्यात मुलाला दाखवायला पैसे नाही, दारू प्यायला पैसे आहेत, असे सांगितल्याचा राग मनात धरून भाचाने वयोवृद्ध मामाला पलंगावरून उचलून जमिनीवर आपटले. त्यांच्या छातीवर झाडाची कुंडी फेकून मारल्याने मामाचा मृत्यु झाला. बाबुलाल सोमा गावीत (७४,रा.मुळ पिंपळनेर, ता.साक्री) असे मयत झालेल्या इसमाचे नाव आहे.

याप्रकरणी पंचवटी पोलिसांनी संशयित मच्छिंद्र सुखदेव मानभाव (२७,रा.कोळीवाडा, हिरावाडी) याच्याविरोधात खूनाचा गुन्हा दाखल केला आहे.
हिरावाडी भागातील कोळीवाडा येथे आंबेडकर आवास योजनेत मागील दोन महिन्यांपासून शीला सुखदेव मानभाव यांच्या घरी बाबुलाल गावीत हे वास्तव्यास होते. संशयित मच्छिंद्र याचा मुलाच्या पायाला चटका बसल्याने दुखापत झाली.

त्यामुळे त्याला दवाखान्यात घेऊन जायला पैसे नाही, दारू प्यायला पैसे आहेत, असे बाबुलाल यांनी सांगितले. त्याचा राग आल्याने संशयित मच्छिंद्र याने त्याचा मामा बाबुलाल यांना उचलून जमिनीवर आपटले. यामुळे त्यांना जबर मार बसला व प्रकृती बिघडून ते बेशुद्ध पडले. त्यांना शासकिय जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी शनिवारी (दि.१६) दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले, असे फिर्यादी इंदुबाई सुखदेव खाने (६७,रा.पिंपळनेर) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

या फिर्यादीवरून पंचवटी पोलिस ठाण्यात संशयित मच्छिंद्रविरूद्ध त्याचा मामा बाबूलालचा खून केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरिक्षक अनिल शिंदे यांनी दिली. पोलिसांनी मच्छिंद्र यास ताब्यात घेतले आहे, असे शिंदे यांनी सांगितले.

Web Title: Mama was picked up from the bed by her nephew. Panchavati police put shackles in the crime of murder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.