शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

डोंबिवलीतील स्फोटप्रकरणी मालती मेहता नाशिकमध्ये अटकेत

By दिनेश पठाडे | Updated: May 24, 2024 16:36 IST

मालती मेहता या अमुदान कंपनीच्या मालक असून बॉयलर स्फोटप्रकरणी त्यांच्यासह मलय मेहतांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिनेश पाठक, नाशिक : डोंबिवली एमआयडीसीमध्ये झालेल्या स्फोटप्रकरणी मुख्य आरोपी मालती मेहता यांना नाशिकपोलिसांनी शहरातील मेहेरधाम परिसरातील पेठ राेड येथून ताब्यात घेतले आहे. सूनेच्या भावाकडे त्या अटक टाळण्यासाठी लपून बसल्या होत्या. मालती मेहता या अमुदान कंपनीच्या मालक असून बॉयलर स्फोटप्रकरणी त्यांच्यासह मलय मेहतांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डोंबिवलीतील रिअ‍ॅक्टर स्फोटात ११ जण मृत झाले होते. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला. डोंबिवली येथील एमआयडीसीतील अमुदान स्फोटातील मुख्य आरोपी मालती मेहता या नाशिकला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार गुरूवारी रात्रीपासून नाशिक क्राईम ब्रांच युनिट एक आणि आणि ठाणे क्राईम ब्रांच पोलिसांनी संयुक्त पद्धतीने कारवाई करत त्यांना अटक केली आहे.

डोंबिवलीमध्ये स्फोट झाल्यानंतर अमुदान कंपनीचे मालक फरार झाले होते. त्यांच्या मोबाईलचे लोकेशन पोलिसांनी तपासले. ते नाशिक येथे असल्याची पक्की खबर मिळाली. त्यानुसार ठाणे पोलिसांचे पथक नाशिक पोलिसांच्या संपर्कात होते. डोंबिवलीतील कंपनीत स्फोट झाल्यानंतर मुख्य आरोपी मालती मेहता या नाशिकमध्ये पोहोचल्या होत्या. त्यांनी त्यांच्या नातेवाईकाच्या घरी आश्रय घेतला होता. त्यांच्या अटकेची माहिती पंचवटी पाेलिस ठाण्याचे वरिेष्ठ पाेलिस निरीक्षक मधुकर कड यांनी दिली. वैद्यकीय तपासणी करून मालती मेहता यांना ठाणे पाेलिसांकडे सोपविण्यात आले.

टॅग्स :dombivaliडोंबिवलीBlastस्फोटNashikनाशिकPoliceपोलिस