मालेगावी भीषण आगीत बालकाचा होरपळून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2019 16:31 IST2019-12-10T16:29:27+5:302019-12-10T16:31:23+5:30
सहा झोपड्या खाक : महिला गंभीर जखमी

मालेगावी भीषण आगीत बालकाचा होरपळून मृत्यू
नाशिक : मालेगाव शहरातील अय्युबनगर भागात स्टोव्हच्या भडक्याने आग लागून ६ झोपड्या जळून खाक झाल्या असून यात अडीच वर्षाच्या बालकाचा होरपळून मृत्यू झाला. तर महिला भाजून गंभीर जखमी झाली आहे.
मंगळवारी (दि.१०) दुपारी एक वाजेच्या सुमारास अय्युबनगर भागातील झोपडपट्टीत स्वयंपाक करताना स्टोव्हच्या भडका झाला. यात मोहंमद हस्सान अहमद ह्या बालकाचा होरपळून मृत्यू झाला. तर त्याची आई यास्मिनबानो मोबीन अहमद ही महिला ९० टक्के भाजल्याने गंभीर जखमी झाली. तिला उपचारार्थ सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दुपारी एक वाजेच्या सुमारास स्टोव्हच्या भडक्याने आग लागून एका पाठोपाठ एक अशा सहा झोपड्या जळून खाक झाल्या. दरम्यान, अग्निशमन दलाचे चार बंब घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग नियंत्रणात आणली. अय्युबनगर भागात आगीचे वृत्त समजताच मोठा जमाव जमला होता. आझादनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून चोख बंदोबस्त तैनात केला.