लैंगिक समानतेवर मालेगावी परिषद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2020 00:24 IST2020-02-17T22:45:07+5:302020-02-18T00:24:31+5:30
जेएटी महाविद्यालयात जेंडर इक्वॉलिटी अॅण्ड निमिन अेमपॉवरमेन्ट या विषयावर राज्यशास्त्र विभागातर्फे एक दिवसीय राष्टÑीय परिषद घेण्यात आली. उद्घाटन संस्थेचे चेअरमन अलहाज निहाल अहमद अन्सारी यांच्या हस्ते झाले. प्रथम सत्रात अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव अलहाज मुश्ताक अहमद एम.ए. होते. प्राचार्य डॉ. अन्सारी हारुण मो. रमजान यांनी स्वागत केले

मालेगावी जेएटी महिला महाविद्यालयात शोधनिबंधाच्या पुस्तकाचे प्रकाशन करताना निहाल अहमद अन्सारी, मुश्ताक अहमद, अन्सारी हारुण मो. रमजान, नियाझ लोधी जैनुलब्दीन सेठ, तुफैल, इलियास मुन्ना आदी.
मालेगाव : येथील जेएटी महाविद्यालयात जेंडर इक्वॉलिटी अॅण्ड निमिन अेमपॉवरमेन्ट या विषयावर राज्यशास्त्र विभागातर्फे एक दिवसीय राष्टÑीय परिषद घेण्यात आली. उद्घाटन संस्थेचे चेअरमन अलहाज निहाल अहमद अन्सारी यांच्या हस्ते झाले. प्रथम सत्रात अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव अलहाज मुश्ताक अहमद एम.ए. होते. प्राचार्य डॉ. अन्सारी हारुण मो. रमजान यांनी स्वागत केले.
अॅड. नियाझ अहमद लोधी, संस्थेचे विश्वस्त अलहाज जैनुलब्दीन सेठ, अलहाज तुफैल सेठ, अलहाज इलियास मुन्ना शेठ आदी मान्यवर व्यासपिठावर उपस्थित होते. प्रास्ताविक राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ. लोधी कनिझ फातेमा यांनी केले.
यावेळी प्रसंगी व्याख्यात्यांनी उपस्थिताना मार्गदर्शन केले. सोलापूरचे प्रा. डॉ. व्ही. डी. आवारी, डॉ. सुषमा कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले. महिलांवरील अत्याचाराचे वाढते प्रमाण ही चिंताजनक बाब आहे. त्यासाठी समाजाची मानसिकता बदलणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन डॉ. आस्मा खान यांनी केले. डॉ. नेहा वैद्य याचेही भाषण झाले. परिषदेत विद्यार्थिनींनीही शोध निबंधाचे वाचन केले. सूत्रसंचालन प्रा. सुनेत्रा मेश्रामकर, डॉ. लोधी कनिझ फातेमा यांनी केले. डॉ. सलमा सत्तार यांनी आभार मानले.