मालेगावी भिंत कोसळून मजूर ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2019 13:08 IST2019-04-11T13:08:31+5:302019-04-11T13:08:44+5:30

मालेगाव मध्य: शहरातील टेन्शन चौक जवळ सकाळी सव्वा अकरा वाजच्या सुमारास घरांचे नुतनीकरण करण्यात येत असतांना अंगावर भिंत अंगावर पडल्याने मजुराचा जागीच मृत्यू झाला.

Malegaon wall collapsed and killed laborers | मालेगावी भिंत कोसळून मजूर ठार

मालेगावी भिंत कोसळून मजूर ठार

मालेगाव मध्य: शहरातील टेन्शन चौक जवळ सकाळी सव्वा अकरा वाजच्या सुमारास घरांचे नुतनीकरण करण्यात येत असतांना अंगावर भिंत अंगावर पडल्याने मजुराचा जागीच मृत्यू झाला. शहरातील स.नं.१६०/२/अ/१ अन्सारगंज प्लाट नं.१५ पैकी असलेल्या घराचे नुतनिकरणाचे काम सुरू होते. सकाळी सव्वा अकराच्या सुमारास काही कळायच्या आत भिंत अंगावर पडल्याने संजय श्रावण सोनवणे (नाईक) (२३) रा.मडकीनाला, चंदनपुरी याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच आझाद नगर पोलिसांनी धाव घेऊन शवविच्छेदन करण्यासाठी सामान्य रु ग्णालयात पाठविण्यात आले. संजय नाईक यांची घरची परिस्थिती अत्यंत बेताची असल्याने तो बिगारी काम करु न आपला उदरिनर्वाह चालवत होता.त्याच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. 

Web Title: Malegaon wall collapsed and killed laborers

टॅग्स :Nashikनाशिक