मालेगाव : शेतीपंप बसविताना घडली घटना शेततळ्यात बुडून दोन तरुणांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2018 00:38 IST2018-05-27T00:38:38+5:302018-05-27T00:38:38+5:30
मालेगाव : तालुक्यातील चोंढी येथील ढोणे वस्तीवरील शेततळ्यात पाय घसरून पडल्याने दोघा तरुण मित्रांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला .

मालेगाव : शेतीपंप बसविताना घडली घटना शेततळ्यात बुडून दोन तरुणांचा मृत्यू
मालेगाव : तालुक्यातील चोंढी येथील ढोणे वस्तीवरील शेततळ्यात पाय घसरून पडल्याने दोघा तरुण मित्रांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला .
ज्ञानेश्वर सुकदेव ढोणे (१८), मेघराज सुभाष पोमनार (२०) हे पाण्यात बुडून मृत झालेल्या तरुणांची नावे आहेत. शनिवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. ज्ञानेश्वर व मेघराज हे शेततळ्यात शेतीपंप बसवित असताना ज्ञानेश्वर याचा पाय घसरून तळ्यात पडला. त्याला वाचविण्यासाठी मेघराज गेला असता यात दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.
ज्ञानेश्वर हा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिक्षण घेत होता, तर मेघराज हा बारावीचे शिक्षण घेत होता. या दुर्दैवी घटनेमुळे चोंढी गावावर शोककळा पसरली. या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे. पुढील तपास हवालदार आर. आर. हिरे करीत आहेत.