मालेगावी दरोड्याचा प्रयत्न; दोघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2018 14:12 IST2018-12-21T14:12:37+5:302018-12-21T14:12:55+5:30
मालेगाव : शहरातील द्याने येथे दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या दोन दरोडेखोरांना रमजानपुरा पोलीसांनी अटक केली असून एक जण फरार झाला आहे.

मालेगावी दरोड्याचा प्रयत्न; दोघांना अटक
मालेगाव : शहरातील द्याने येथे दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या दोन दरोडेखोरांना रमजानपुरा पोलीसांनी अटक केली असून एक जण फरार झाला आहे. या प्रकरणी रमजानपुरा पोलीसात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार आरोपीचा पोलीस शोध घेत असून यामुळे परिसरात घबराट पसरली आहे. काल पहाटे ४ वाजेच्या सुमारास रमजानपुरा पोलीस गस्त घालीत असताना द्याने परिसरात कुसुंबारस्त्यावर मिलन हॉटेलच्या शेजारी संशयीत तीन आरोपी दिल्याने पोलीसांनी त्यांना हटकले. संशयीत इसम पळू लागल्याने पोलीसांनी धाव घेऊन दोघांना जेरबंद केले तर एक जण पळून जाण्यात यशस्वी झाला. सदर आरोपींनी दरोडा टाकण्याच्या उद्देशाने स्वत: जवळ दरोड्याचे साहित्य बाळगले होते. त्यांच्या ताब्यातुन चाकू, कटर, नाईलॉनची दोरी, मिरची पावडर, चाव्यांचा गुच्छ, लोखंडी सळई, दोन भ्रमणध्वनी संच असा एकूण ५ हजार ६१० रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले. पोलीसांच्या सतर्कतेमुळे आरोपींचा दरोडा टाकण्याचा प्रयत्न फसला. शेख हारुण शेख शकील हा अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला. तर शेख एकलाक शेख एकबाल उर्फ शाहरुख (२३) व वासीम शहा हुसेन शहा (२२) या दोघांना रमजानपुरा पोलीसांनी अटक केली. उपविभागीय पोलीस अधिकारी नवले यांनी घटनास्थळाची पाहणी केली असून अधिक तपास जी. सी. तांबे करीत आहेत.