मालेगावी राष्ट्रवादीचा बैलगाडी मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 15:33 IST2021-06-25T15:32:39+5:302021-06-25T15:33:27+5:30

मालेगाव : नाशिक जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्यावतीने पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅसच्या दरवाढीच्या निषेधार्थ मालेगाव येथील अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढण्यात आला.

Malegaon NCP's bullock cart front | मालेगावी राष्ट्रवादीचा बैलगाडी मोर्चा

मालेगावी राष्ट्रवादीचा बैलगाडी मोर्चा

मालेगाव : नाशिक जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्यावतीने पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅसच्या दरवाढीच्या निषेधार्थ मालेगाव येथील अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढण्यात आला. केंद्रातील मोदी सरकारला सर्व सामान्य जनतेच्या प्रश्नाशी कुठलेही देणेघेणे नसून पेट्रोल-डिझेलची मोठ्या प्रमाणावर दरवाढ झाल्याने महागाईचा भडका उडाला आहे. या महागाईस भाजप सरकारच जबाबदार असल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.रविंद्र पगार यांनी केला आहे. यावेळी तालुकाध्यक्ष संदीप पवार, पुरुषोत्तम कडलग, प्रेरणा बलकवडे, डॉ. जयंत पवार, राजेंद्र भोसले, अरुण देवरे, राजेंद्र जाधव, यशवंत शिरसाट आदींची भाषणे झाली. यावेळी गिरणा सहकारी कारखान्याचे माजी चेअरमन विजय रामजी पवार, मालेगाव मर्चंट बँकेचे चेअरमन राजेंद्र भोसले, मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे संचालक डॉ. जयंत पवार, माजी संचालक अरुण देवरे, सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष यशवंत शिरसाट, विजय पवार, राजेंद्र जाधव, विनोद शेलार, गुलाबराव चव्हाण, प्रकाश वाघ, अशोक पवार, रतन हलवर, सलीम रिझवी, प्रफुल्ल पवार, अरुण आहेर, प्रशांत पवार, बाळासाहेब वाणी, संदीप अहिरे, अशोक निकम, किशोर इंगळे, बागलाण तालुकाध्यक्ष शैलेश सुर्यवंशी, राजेंद्र सोनवणे आदी उपस्थित होते.
-----------------

कार्यकत्यार्ंची घोषणाबाजी
केंद्रातील मोदी सरकारमुळेच पेट्रोलने प्रति लिटरला किंमतीचे शतक पार केले असून डिझेल देखील शतकाच्या उंबरठ्यावर आहे. त्यामुळे कॉंग्रेस आघाडी सरकारच्या काळात इंधनाचे दर थोडेफार वाढले की, बहुत हुई मेहंगाई की मार... अशी घोषणा देणारे नेते आता पेट्रोलचे भाव १०४ रुपये तर डिझेलचे भाव ९६ रुपये प्रति लिटर झाले तरी शांत का असा सवाल पगार यांनी यावेळी बोलतांना केला. एकही भुल कमल का फुल; पेट्रोल डिझेलची दरवाढ मागे घ्या. यासोबतच पेट्रोल डिझेलचे भाव कमी झालेच पाहिजेत यासोबतच केंद्र सरकारच्या विरोधात निषेध व्यक्त करून आंदोलकांकडून घोषणाबाजी करण्यात आली.

Web Title: Malegaon NCP's bullock cart front

टॅग्स :Nashikनाशिक