मालेगावी राष्ट्रवादी काँग्रेसचा युवक मेळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:20 IST2021-08-17T04:20:03+5:302021-08-17T04:20:03+5:30
शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आसिफ शेख यांच्या अध्यक्षतेखाली, प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष महबूब ...

मालेगावी राष्ट्रवादी काँग्रेसचा युवक मेळावा
शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आसिफ शेख यांच्या अध्यक्षतेखाली, प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष महबूब शेख यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी युवकांचा मेळावा संपन्न झाला या वेळी महेबूब शेख म्हणाले की, भारतीय जनता पार्टीला केंद्रातून सत्तेपासून दूर करण्याचे काम फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी करू शकते. पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्या नियोजनबद्ध निर्णयामुळेच आज महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आहे, असे सांगितले.
आसिफ शेख म्हणाले की, शरद पवार यांनी अल्पसंख्याक समुदायासाठी केलेले कार्य, राज्यात महविकास आघाडीच्या सरकारमुळेच आज राज्यात येणारा एनआरसी, सीएएसारखा काळा कायदा लागू झाला नाही हे समजून सांगितले. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची विचारधारा, एमआयएम पक्ष ही भाजपची बी टीम असल्याचा आरोप केला. या युवा मेळाव्यास मालेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्याध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष व कार्याध्यक्ष, राष्ट्रवादी अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष, कार्याध्यक्ष, राष्ट्रवादी सेवादल काँग्रेस अध्यक्ष, कार्याध्यक्ष, सर्व राष्ट्रवादी ब्लॉक अध्यक्ष, राष्ट्रवादी व्यापार सेलचे अध्यक्ष, कार्यकर्ते उपस्थित होते.