शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
4
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
5
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
6
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
7
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
8
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
9
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
10
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
11
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
12
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
13
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
14
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
15
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
16
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
18
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
19
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
20
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
Daily Top 2Weekly Top 5

मालेगाव मनपा : स्थायीसह बालकल्याण समितीच्या प्रत्येकी नऊ सदस्यांची निवड

By admin | Updated: July 29, 2014 00:55 IST

सत्तारुढ कॉँग्रेस-तिसरा महाज युती संपुष्टात; महाजमध्ये फूट

मालेगाव: येथील महानगरपालिकेच्या विशेष महासभेत मनपा स्थायी समिती तसेच महिला व बालकल्याण समितीच्या प्रत्येकी नऊ सदस्यांची निवड करण्यात आली. याप्रसंगी मनपातील सत्तारुढ कॉँग्रेस व तिसरी आघाडी यांच्यातील युती संपुष्टात आल्याचे स्पष्ट झाले. तसेच तिसऱ्या आघाडीतही फूट पडल्याचे दिसून आले. त्यामुळे सदर महासभा, स्थायी, समिती तसेच महिला व बालकल्याण समितीच्या सदस्यांची निवड कायद्याच्या कचाट्यात सापडण्याची शक्यता आहे. येथील महानगरपालिकेतील सोळा सदस्यीय स्थायी समितीतील सात जणांची मुदत येत्या १ आॅगस्टला संपुष्टात येत आहे. तसेच आपल्या सर्व नगरसेवकांना स्थायी सदस्यत्वाची संधी मिळावी म्हणून शिवसेनेच्या दोन सदस्यांनी राजीनामे दिले आहेत. त्यामुळे स्थायीच्या नऊ तसेच महिला व बालकल्याण समितीच्या नऊ सदस्य निवडीसाठी मनपाची सर्वसाधारण महासभा तहकूब झाल्यानंतर विशेष महासभा झाली. महासभेत कॉँग्रेसतर्फे खालिद शेख, तिसऱ्या आघाडीतर्फे नरेंद्र सोनवणे, शिवसेनेतर्फे मनोहर बच्छाव, शहर विकास आघाडीतर्फे युनूस ईसा, मालेगाव विकास आघाडीतर्फे सुनील गायकवाड, जनता दलातर्फे बुलंद एक्बाल व जनराज्य आघाडीतर्फे प्रा. रिजवान खान या गटनेत्यांनी आपापल्या सदस्यांच्या नावांची बंदपाकिटे महापौर ताहेरा शेख यांच्याकडे सादर केली. त्यानुसार ही नावे जाहीर करण्यात आली. तिसऱ्या आघाडीची नावे जाहीर होण्याआधी तिसरा महाजचे मोहंमद सुलतान यांनी राज्य निवडणूक आयोग व विभागीय आयुक्तयांच्या पत्राचा दाखला देत आपणच तिसऱ्या महाजचे गटनेते असल्याचा दावा केला. तसेच आपण सुचविलेल्या सदस्यांचीच निवड जाहीर करण्याची विनंती केली. महापौर ताहेरा शेख यांनी ती विनंती मान्य करत मोहंमद सुलतान यांनी दिलेल्या बंद पाकिटातील नावांची घोषणा केली. तिसऱ्या आघाडीच्या गटनेत्यांंनी यास जोरदार हरकत घेतली. आपणच तिसरा महाज व इतर सदस्य मिळून स्थापन झालेल्या तिसऱ्या आघाडीचे गटनेते असून, आपण सुचविलेल्या सदस्यांची निवड करण्याची विनंती केली. मात्र महापौर शेख यांनी ती विनंती धुडकावली. सभागृहात उपस्थित महाजच्या इतर सदस्यांनीही सोनवणे यांना साथ दिली नाही. त्यामुळे सोनवणे हे एकाकी पडले. तसेच सत्तारुढ महाजमध्ये फूट पडल्याचेही स्पष्ट झाले. २३ सदस्यीय तिसरी आघाडी फुटून १९ सदस्यांवर आल्यामुळे स्थायीतील त्यांचे संख्याबळ एकने घटले आहे. त्यामुळे त्या एका सदस्याच्या जागी आपली निवड करावी, अशी विनंती जनराज्य आघाडीचे एकमेव सदस्य प्रा. रिजवान खान यांनी केली. ती तकाळ मान्य करत महापौर शेख यांनी प्रा. खान यांची निवड जाहीर केली. यावेळी स्थायीच्या तसेच महिला व बालकल्याण समितीच्या प्रत्येकी नऊ सदस्यांची नावे जाहीर करण्यात आली. प्रा. खान यांची दोन्ही समित्यांवर निवड जाहीर करण्यात आली. राष्ट्रगीताने महासभेची सांगता झाली. मात्र महासभा झाल्यानंतर कॉँग्रेस, तिसरी आघाडीच्या नेत्यांनी वेगवेगळे दावे केले आहेत. सभागृहात एकाकी पडलेल्या तिसऱ्या आघाडीच्या नेत्यांनी याप्रकरणी योग्य ती कायदेशीर पावले उचलण्याचे संकेत दिल्यामुळे सदरची महासभा व त्यातील स्थायी समिती सदस्य तसेच महिला व बालकल्याण समितीच्या सदस्यांची निवड ही कायद्याच्या कचाट्यात सापडण्याची शक्यता आहे.