मालेगाव : बिहार राज्यात मेंदुज्वराने झालेले बालमृत्यू, शहीद जवानांना व शहरातील दिवंगतांना श्रद्धांजली अर्पण करून मालेगाव महानगरपालिकेची गुरुवारची महासभा तहकूब करण्यात आली. तहकूब केलेली ही महासभा येत्या २७ जून रोजी होणार आहे. यामध्ये गुरुवारच्या सभेसमोरील अजेंड्यावरील नऊ विषयांवर चर्चा केली जाणार आहे. शहर स्वच्छता, गृहकर वसुली आदी विषयांवर चर्चा होणार आहे.
मालेगाव मनपाची महासभा तहकूब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 01:11 IST