आज मालेगाव महापौर, उपमहापौरपदाची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2019 00:58 IST2019-12-12T00:58:30+5:302019-12-12T00:58:54+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : मालेगाव महापालिकेच्या महापौरपदी काँग्रेसच्या ताहेरा शेख व उपमहापौरपदी शिवसेनेचे नीलेश आहेर यांची निवड जवळपास ...

आज मालेगाव महापौर, उपमहापौरपदाची निवड
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : मालेगाव महापालिकेच्या महापौरपदी काँग्रेसच्या ताहेरा शेख व उपमहापौरपदी शिवसेनेचे नीलेश आहेर यांची निवड जवळपास निश्चित झाली आहे. गुरुवारी (दि. १२) रोजी महापालिकेच्या सभागृहात महापौर - उपमहापौरांची निवडीची अधिकृतरीत्या घोषणा केली जाणार असून, या औपचारिक निवडीकडे शहरवासीयांचे लक्ष लागून आहे.
गुरुवारी सकाळी ११ वाजता महापालिकेच्या सभागृहात विशेष महासभेचे आयोजन करण्यात आले आहे. निवडणूक निर्णय अधिकारी तथा पीठासीन अधिकारी म्हणून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी एस. भुवनेश्वरी उपस्थित राहणार आहेत. (पान २ वर)भाजपची साथगेली अडीच वर्षे काँग्रेस व सेनेची महापालिकेवर सत्ता होती. काँग्रेसचे रशीद शेख हे महापौर,तर सेनेचे सखाराम घोडके उपमहापौर होते. काँग्रेस व सेनेने महापौर-उपमहापौरपद टिकवून ठेवले आहे. भाजपच्या नगरसेवकांनाही आपल्या गोटात आणण्याची खेळी यशस्वी झाली आहे.