मालेगावी लक्झरी बसची दुचाकीला धडक; एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2021 07:52 PM2021-01-11T19:52:11+5:302021-01-12T01:27:43+5:30

मालेगाव : नामपूर-मालेगाव रस्त्यावर हॉटेल मेजवानीनजीक हेमंत चव्हाण यांच्या शेतासमोर कोठरे शिवारात लक्झरी बसने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीस्वार अमोल रूपसिंग तवर (२५) रा. कोठरे हा गंभीर जखमी होऊन ठार झाला. याप्रकरणी मंगलसिंग भगतसिंग तवर (३५) रा. कोठरे यांनी वडनेर खाकुर्डी पोलिसात खबर दिली. पोलिसांनी लक्झरी चालक रोशन सर्फराज शेख रा. काळू नानाजीनगर, बसस्टॅण्डजवळ, सटाणा याचे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

Malegaon luxury bus hits two-wheeler; One killed | मालेगावी लक्झरी बसची दुचाकीला धडक; एक ठार

मालेगावी लक्झरी बसची दुचाकीला धडक; एक ठार

Next

गेल्या शनिवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. लक्झरी बस क्रमांक एमएच १८ बीजी ६३५५ नामपूरकडून मालेगावकडे भरधाव वेगात नेताना मालेगावकडून नामपूरकडे जाणारी दुचाकी क्रमांक एमएच ४१ एव्ही ५३५०ला समोरून धडक दिली. यात दुचाकीस्वार ठार झाला, तर बस पलटी झाल्याने बसमधील सुमारे १५ प्रवासी किरकोळ जखमी झाले. दुचाकीस्वाराच्या मरणास, बसमधील प्रवाशांच्या दुखापतीस व दुचाकीच्या नुकसानीस कारणीभूत होऊन अपघाताची खबर न देता पळून गेला म्हणून बसचालकाविरोधात वडनेर खाकुर्डी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास जमादार निकम करीत आहेत.

Web Title: Malegaon luxury bus hits two-wheeler; One killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.