शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा मालेगावी मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2018 18:35 IST2018-08-09T18:35:27+5:302018-08-09T18:35:57+5:30
मालेगाव कॅम्प : मालेगाव सरकारी, निमसरकारी कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेतर संघटनांचा आपल्या विविध मागण्यांसाठी अपर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. आपल्या मागण्यांचे निवेदन अपर जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकाºयांना देण्यात आले.

शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा मालेगावी मोर्चा
मालेगाव कॅम्प : मालेगाव सरकारी, निमसरकारी कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेतर संघटनांचा आपल्या विविध मागण्यांसाठी अपर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. आपल्या मागण्यांचे निवेदन अपर जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकाºयांना देण्यात आले.
शहरात या विविध संघटनांचा मागण्यांसाठी गेल्या तीन दिवसांपासून संप सुरू आहे. आज तिसºया दिवशी संघटनांनी मोर्चाचे आयोजन केले होते. सकाळी अकरा वाजेपासून मोर्चेकरी नवीन तहसिल कार्यालय आवारात एकत्रीतपणे जमा झाले तेथे प्रमुख सदस्यांची भाषणे झाली. धडक मोर्चा एकात्मता चौक, कॅम्प रस्तामार्गे नेण्यात आला.
निवेदनात म्हटले आहे की, सहावा, सातवा वेतन आयोगातील त्रुटी दूर करुन त्वरित अंमलबजावणी करावी, जुने निवृत्ती वेतन लागु करावे, निवृत्ती वय ६० वर्षे निश्चित करावे, पाच दिवसांचा आठवडा, सर्व संवर्गातील रिक्तपदे भरती, अनुकंपाभरती, महिला कर्मचारी यांना बालसंगोपन रजा मंजुरी, शासकीय कार्यालयातील ठेकेदार पद्धत, खाजगीकरण रद्द करण्यात यावे, विनाअनुदानित शाळांना नियमानुसार अनुदान देण्यात यावे अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.
आंदोलनात शिक्षक संघटनेचे नेते आर. डी. निकम, अनिल अहिरे, सचिन देशमुख, संजय पगार, धनंजय पाटील, अविनाश पाटील, हंसराज देसाई, प्रदिप अहिरे, के. डी. चंदन, विनायक ठोंबरे, एस. पी. खैरनार तसेच तलाठी संघाचे जिल्हा प्रतिनिधी पी. एस. पवार, अध्यक्ष पी. बी. पाटील, पी. डी. खैरनार, टी. एस. देवरे, डी. एम. सोळेंवार, कविता पठाडे, ज्योती वाणी, रमेश धाडीसह शिक्षक, महसुली, सरकारी, निमसरकारी, संघटनांचे कर्मचरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.