मालेगावी चेन स्नॅचिंगचे सत्र सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2021 00:52 IST2021-10-09T00:51:15+5:302021-10-09T00:52:16+5:30
मालेगावी ‘स्नॅचर’ चोरट्यांचा धुमाकूळ वाढला असून, नागरिक त्रस्त झाले आहेत. हे सत्र थांबण्याचे लक्षण दिसत नाहीत. मालेगावी मोबाइल व चेन स्नॅचिंगचे प्रकार सर्रास घडत आहेत. रस्त्यावर चालणाऱ्याच्या हातातील मोबाइल लांबविणे, तसेच दुचाकीस्वाराच्या वरच्या खिशातील मोबाइल उडविणे हे प्रकार तर नित्याचे बनले आहेत, शिवाय चेन स्नॅचिंगचा प्रकारही मोठ्या प्रमाणात चालू असून, आठ-पंधरा दिवसांत शहरात वेगवेगळ्या भागात या घटना जोर धरत आहेत.

मालेगावी चेन स्नॅचिंगचे सत्र सुरूच
सोयगाव : मालेगावी ‘स्नॅचर’ चोरट्यांचा धुमाकूळ वाढला असून, नागरिक त्रस्त झाले आहेत. हे सत्र थांबण्याचे लक्षण दिसत नाहीत. मालेगावी मोबाइल व चेन स्नॅचिंगचे प्रकार सर्रास घडत आहेत. रस्त्यावर चालणाऱ्याच्या हातातील मोबाइल लांबविणे, तसेच दुचाकीस्वाराच्या वरच्या खिशातील मोबाइल उडविणे हे प्रकार तर नित्याचे बनले आहेत, शिवाय चेन स्नॅचिंगचा प्रकारही मोठ्या प्रमाणात चालू असून, आठ-पंधरा दिवसांत शहरात वेगवेगळ्या भागात या घटना जोर धरत आहेत.
काही दिवसांपूर्वी कॅम्प भागातील डॉ.गांगुर्डे यांच्या हॉस्पिटलजवळ रिक्षातून उतरत असलेल्या वृद्ध महिलेची गळ्यातील पोत लांबविली. त्याचा तपास लागत नाही, तोच सोयगावातील बजरंग कॉलनीत गुरुवारी (दि.७) सकाळी नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी पुन्हा एक चेन स्नॅचिंगचा प्रकार घडला. कॉलनीत राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिक प्रमिला रामचंद्र जाधव (वय ७१) या सकाळी देवपूजा आवरून तुळशीस घराबाहेर पाणी घालण्यास आल्या असता, एका दुचाकीवर दोन अज्ञात (वय ३० ते ३५) तरुण आले. पत्ता विचारण्याच्या बहाण्याने वृद्ध महिलेच्या जवळ जात त्यांच्या गळ्यातील दीड तोळ्याची पोत ओढून बाइकवर पसार झाले. या संदर्भात कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला गेला आहे, तसेच परिसरात काही दिवसांपूर्वी असेच प्रकार वंदना लाँड्रीजवळ व डी.के. चौकातही घडल्याचे नागरिकांनी सांगितले. या चेन स्नॅचिंग प्रकारात लोकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. चेन स्नॅचिंग करताना गळा कापला जाऊन जीव जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. मालेगावातील पोलीस प्रशासन या वाढत्या प्रकाराबद्दल काय कारवाई करणार आहेत, असा सवाल केला जात असून, नुसते पेट्रोलिंग करून उपयोग नाही, तर कार्यवाही होऊन चोरटे पकडणे महत्त्वाचे आहे. वरिष्ठांनी या प्रकारात लक्ष घालावे, अशी मागणी होत आहे.
कोट....
अतिशय भयावह प्रकार आहे. अशा प्रकारांमुळे आम्हा ज्येष्ठ नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. अशा घटनेत अनेक महिलांचे प्राणही गेले आहेत. याचा अर्थ, मालेगावी महिला वर्ग सुरक्षित नाहीत. पोलीस प्रशासनाने अशा गुन्हेगारांवर कठोर अशी कारवाई करावी.
- प्रमिला जाधव, फिर्यादी.