मालेगावचा पूल जीवघेणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2020 00:23 IST2020-07-23T21:46:40+5:302020-07-24T00:23:40+5:30
मालेगाव : द्याने शहरातील द्याने भागास जोडणारा मोसम नदीवरील फरशी पुलाची उंची कमी असल्याने पावसाळ्यात शाळांमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांना नदीच्या पाण्यातून वाट काढत जावे लागते. यासाठी फरशी पुलाची उंची वाढवावी, अशी मागणी द्यानेतील नागरिकांनी केली आहे. मालेगाव कॅम्पातून द्याने वडगाव भागात जाण्यासाठी अत्यंत जवळचा मार्ग म्हणून नागरिक या पुलाचा वापर करतात.

मालेगावचा पूल जीवघेणा
मालेगाव : द्याने शहरातील द्याने भागास जोडणारा मोसम नदीवरील फरशी पुलाची उंची कमी असल्याने पावसाळ्यात शाळांमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांना नदीच्या पाण्यातून वाट काढत जावे लागते. यासाठी फरशी पुलाची उंची वाढवावी, अशी मागणी द्यानेतील नागरिकांनी केली आहे.
मालेगाव कॅम्पातून द्याने वडगाव भागात जाण्यासाठी अत्यंत जवळचा मार्ग म्हणून नागरिक या पुलाचा वापर करतात. मालेगावात रोजगारासाठी येणारे लोक - महिला या फरशी पुलाचा वापर करतात तर शाळा - महाविद्यालयात शिकणारी मुले सायकलीने आणि काही मुले पायी या फरशी पुलावरून जात असतात.
पावसाळ्यात नदीला पाणी आल्यास फरशी पुलावरून वाहत जाते. पाण्यातून लहान मुले रस्ता काढत जातात. नदीला पूर आल्यास पाण्यात पडून लहान मुलांसह नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो. याकरिता मालेगावहून द्यानेला जोडणाºया फरशी पुलाची उंची वाढविण्याची आवश्यकता आहे. महानगरपालिकेतर्फे शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या रामसेतू पुलाला संरक्षक कठडे बसविण्याचे काम सुरू केले आहे. संगमेश्वरातील सांडवा पुलाची उंचीदेखील कमी असून, ती वाढविण्याची आवश्यकता आहे.