शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: गोरेगावच्या नेस्को सेंटर ड्रग्ज पार्टीचं नागपूर कनेक्शन
3
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
4
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
5
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
6
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
7
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
8
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
9
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
10
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
11
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
12
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
13
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
14
टीसीएस प्रकरणात परकीय कट्टरपंथीयांकडून फंडिंग? पोलिस आयुक्तालयाचा ‘एनआयए’शी पत्रव्यवहार
15
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
16
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
17
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
18
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
19
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
20
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
Daily Top 2Weekly Top 5

मालेगावी कुत्ता गोळी, औषधे विकणाऱ्या तडीपार गुंडाला अटक

By admin | Updated: September 29, 2016 01:31 IST

मालेगावी कुत्ता गोळी, औषधे विकणाऱ्या तडीपार गुंडाला अटक

मालेगाव : वैद्यकीय सल्ला व पावतीशिवाय सेवन करण्यास मनाई असलेल्या अल्प्रालोझम (मालेगावच्या भाषेत कुत्ता गोळी) व कोडीन फॉस्फेट औषध व गोळ्या जवळ बाळगून त्या नशेसाठी विक्री करणाऱ्या दोन वर्षासाठी शहरातून तडीपार असलेल्या नसीम अख्तर मो. सलीम ऊर्फ नसीम मोट्या, रा. हकीमनगर याला आझादनगर पोलिसांनी छापा टाकून अटक केली आहे. त्याच्याजवळून बारा हजार ९०४ रूपये किमतीचे औषधे व गोळ्या जप्त केल्या आहेत. आझादनगर पोलीस व अन्न व औषध प्रशासनाच्या संयुक्त पथकाने बुधवारी पाच वाजेच्या सुमारास ही कारवाई केली. मालेगाव शहरात नशेसाठी औषधे व गोळ्यांचा वापर केला जात असल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक राकेश ओला, आझादनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मसूद खान यांना मिळाली होती. त्यानुसार आझादनगरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक व्ही. जे. टकले, पोलीस हवालदार प्रकाश बनकर, सुनील पाटील, अमोल पाटील, लक्ष्मण वाघ यांनी नसीम मोट्या याच्या हकीमनगर भागातील घरावर छापा टाकला. यावेळी त्याच्याकडे अल्प्रालोझम या चार हजार ९०४ रूपये किंमतीच्या दोन हजार १७० गोळ्या व कोडीन फॉस्फेट नावाचे आठ हजार रूपये किंमतीच्या ७७ बाटल्या आढळून आल्या. अन्न व औषध प्रशासन विभागाचे औषध निरीक्षक अश्विन ठाकरे, चंद्रकांत मोरे यांनी गोळ्या व औषधांची तपासणी केली आहे. औषध निरीक्षक ठाकरे यांच्या फिर्यादीवरुन आझादनगर पोलीस ठाण्यात नसीम मोट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच तडीपार असताना शहरात वास्तव्य केल्याप्रकरणीही पोलीसांकडून वेगळा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)