मालेगावी भाजपचा कार्यकर्ता प्रशिक्षण मेळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2018 00:33 IST2018-02-09T22:53:42+5:302018-02-10T00:33:16+5:30
मालेगाव : भारतीय जनता पार्टी मालेगाव मध्य विधानसभा ११४ च्या बूथ प्रमुख प्रशिक्षण मेळावा शेख उस्मान स्कूल हजार खोली येथे झाला.

मालेगावी भाजपचा कार्यकर्ता प्रशिक्षण मेळावा
मालेगाव : भारतीय जनता पार्टी मालेगाव मध्य विधानसभा ११४ च्या बूथ प्रमुख प्रशिक्षण मेळावा शेख उस्मान स्कूल हजार खोली येथे झाला. त्यात मालेगाव मध्य विधानसभेत २१८ बूथ प्रमुखपैकी १५० बूथ प्रमुखाचे प्राशिक्षण लोकसभा कॉर्डिनेटर प्रवीण चित्ते यांनी प्रशिक्षण दिले. त्यावेळी महानगर भाजपा जिल्हाध्यक्ष सुनील गायकवाड, मालेगाव मध्य विस्तारक एजाज शेख, मोर्चा प्रदेश सचिव शेख इब्राहिम, मोर्चा जिल्हाध्यक्ष रियाज अली, जिल्हा उपाध्यक्ष अखलाक नागा व कार्यकर्ते उपस्थित होते. प्रास्ताविक एजाज शेख यांनी केले, तर सूत्रसंचालन रियाज अली यांनी केले.