मकवाना हत्त्या; संशयित फरारच
By Admin | Updated: February 18, 2016 23:47 IST2016-02-18T23:45:15+5:302016-02-18T23:47:14+5:30
मकवाना हत्त्या; संशयित फरारच

मकवाना हत्त्या; संशयित फरारच
नाशिकरोड : जयभवानीरोड येथील प्रापर्टी डीलर रणजित मकवाना याची मंगळवारी (दि.१६) मध्यरात्री पूर्ववैमनस्यातून गोळी झाडून तोफखाना रस्त्यावर हत्त्या करण्यात आली होती. या हत्त्या प्रकरणातील चौघे संशयित अद्याप फरार असून, पोलिसांचे तपास पथके संशयितांपर्यंत पोहचण्यास अपयशी ठरत आहेत. या प्रकरणातील फर्नांडीसवाडी येथील संशयित रोहित उर्फ माले गोविंद डिंगम, मयूर चमन बेद, संजय उर्फ मॉडेल चमन बेद, विनोद राजाराम साळवे हे चौघे संशयित अद्याप फरार असून, यांनी रणजितला देवरथ अपार्टमेंटच्या खालून सोबत घेऊन गेले होते. पोलिसांनी या हत्त्येप्रकरणी चार तपासी पथके वेगवेगळ्या ठिकाणी रवाना के ले आहे; मात्र अद्याप कुठल्याही तपास पथकाला संशयितांपर्यंत पोहचण्यास यश आले नाही.