जिल्ह्यातील आठवी ते बारावीपर्यंतच्या शाळांचा मार्ग मोकळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:17 IST2021-07-07T04:17:47+5:302021-07-07T04:17:47+5:30
चौकट==== घ्यावी लागणारी काळजी शाळा सुरू करण्याबाबत कोरोनामुक्त गावातील ग्रामपंचायतीने त्यांच्या अखत्यारित असलेल्या गावातील इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग ...

जिल्ह्यातील आठवी ते बारावीपर्यंतच्या शाळांचा मार्ग मोकळा
चौकट====
घ्यावी लागणारी काळजी
शाळा सुरू करण्याबाबत कोरोनामुक्त गावातील ग्रामपंचायतीने त्यांच्या अखत्यारित असलेल्या गावातील इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याबाबत पालकांशी चर्चा करून तसा ठराव करावा, शाळा सुरू केल्यानंतर मुलांना टप्पाटप्प्याने शाळेत बोलविण्यात यावे, सकाळ व दुपार असे दोन सत्र करून विद्यार्थ्यांना विषयानुरूप बोलवावे, एका बाकावर एक विद्यार्थी, दोन बाकांवर सहा फूट अंतर व एका वर्गात जास्तीत जास्त १५ ते २० विद्यार्थी बसविण्यात यावे अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
चौकट ==
जिल्ह्यात १३०० शाळा होणार सुरू
नाशिक जिल्ह्यात आठवी ते बारावीपर्यंतच्या सुमारे १३२६ शाळा असून, त्यातील सुमारे १३०० शाळा सुरू होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. शाळा सुरू करण्याबाबत ग्रामपंचायतींना व गावांना ऐच्छिक करण्यात आल्यामुळे तसा ग्रामपंचायतींनी ठराव व प्रस्ताव शिक्षण विभागाकडे सादर करावा लागणार आहे.
-----------
नाशिकने केली होती मागणी
कोरोनाची दुसरी लाट कमी झाल्यानंतर आठवी ते दहावीपर्यंतच्या शाळा सुरू करण्यास परवानगी देण्यात यावी, अशी मागणी सर्वप्रथम हिरवेबाजार गावाने केली होती. त्यानंतर नाशिक जिल्ह्यातील व्ही. एन. नाईक संस्थेचे अध्यक्ष पंढरीनाथ थोरे यांनी सिन्नर तालुक्यातील निऱ्हाळे येथील कोरोनामुक्त गावात शाळा सुरू करण्याची अनुमती मिळावी, अशी मागणी शिक्षण विभागाकडे केली होती. त्याचा विचार करून शासनाने हा निर्णय घेतला आहे.