पावसाने मका पीक भुईसपाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2020 00:26 IST2020-08-14T22:32:26+5:302020-08-15T00:26:29+5:30

बागलाण तालुक्यातील पश्चिम आदिवासी पट्ट्यात वादळी पावसामुळे मक्याचे उभे पीक भुईसपाट होऊन मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आमदार दिलीप बोरसे यांनी शुक्रवारी (दि. १४) नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करून पिकांच्या पंचानाम्यांची मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.

Maize crop flattened by rains | पावसाने मका पीक भुईसपाट

बागलाण तालुक्यातील अंबापूर येथे नुकसानग्रस्त मका पिकाची पाहणी करताना आमदार दिलीप बोरसे. समवेत कृषी अधिकारी सुधाकर पवार, नितीन देशमुख आदी.

ठळक मुद्देबागलाण : पंचनाम्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

सटाणा : बागलाण तालुक्यातील पश्चिम आदिवासी पट्ट्यात वादळी पावसामुळे मक्याचे उभे पीक भुईसपाट होऊन मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आमदार दिलीप बोरसे यांनी शुक्रवारी (दि. १४) नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करून पिकांच्या पंचानाम्यांची मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.
दोन दिवसांपासून आदिवासी पश्चिम पट्ट्यातील मुल्हेर, हरणबारी, मोहळागी, माळीवाडा, जैतापूर, अंबापूर, जाड, अलियाबाद परिसरात जोरदार वादळी पाऊस झाला. या वादळी पावसामुळे मक्याचे तीन महिन्यांचे उभे पीक भुईसपाट होऊन पिकांचे नुकसान झाले. दरम्यान, आमदार दिलीप बोरसे यांनी शुक्र वारी अंबापूर, मुल्हेर, हरणबारी, माळीवाडा, अजंदे आदी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी तालुका कृषी अधिकारी सुधाकर पवार, विस्तार अधिकारी नितीन देशमुख आदी उपस्थित होते. आमदार बोरसे यांनी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्याकडे या नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करण्याची मागणी केली आहे. पंचनामे झाल्यास भरपाई मिळवून देण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.४
मे महिन्यात झालेल्या निसर्ग चक्रीवादळाच्या पावसामुळे या भागात हजारो रु पये खर्च करून मक्याचा पेरा केला होता. मात्र पीक जोमात असताना दोन दिवसांच्या वादळी पावसामुळे मका भुईसपाट झाला आहे.

Web Title: Maize crop flattened by rains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.