शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
3
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
5
जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
6
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
7
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
8
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
9
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
10
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
11
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
12
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
13
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
14
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
15
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
16
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
17
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
18
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
19
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
20
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."

नाशिकमधील मेंटेनन्स फ्री देवराईमुळे राखले जाणार पर्यावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2019 00:42 IST

सातपूर शिवारात वनविभागाच्या ४५ एकर जागेत अकरा हजार भारतीय प्रजातीची चार वर्षांपूर्वी झाडे लावली आणि ती जगवून नाशिक देवराई साकारली तर म्हसरूळ येथे सुमारे सहा हजार झाडांचे संवर्धन करून वनराई साकारली आहेत. आपलं पर्यावरण नामक संस्था स्थापन करून जिल्ह्याभरात वृक्ष लागवडीसाठी काम करीत आहेत. वृक्षप्रेमी शेखर गायकवाड यांच्याशी महापालिकेच्या देवराई प्रकल्पाबाबत केलेली बातचीत...

ठळक मुद्दे‘देवराई’च्या निमित्ताने शहरात पर्यावरणपूरक झाडांची लागवड होतेयबोगनवेली सारखी झाडे लावून काय उपयोग?

गेल्या २२ वर्षांपासून वृक्ष प्रेमी शेखर गायकवाड वृक्ष लागवड आणि संवर्धनाचे काम करीत आहेत. कोणत्याही आर्थिक पाठबळाशिवाय पदरदमोड करून त्यांनी आपल्या घराच्या परीसरातील महापालिकेच्या अर्धा एकर जागेवर देवराई साकारली आहे. कोणीही वृक्ष लागवडीसाठी बोलवले की धावत जाऊन वृक्षरोपण करणाऱ्या गायकवाड यांनी सातपूर शिवारात वनविभागाच्या ४५ एकर जागेत अकरा हजार भारतीय प्रजातीची चार वर्षांपूर्वी झाडे लावली आणि ती जगवून नाशिक देवराई साकारली आहे. तर म्हसरूळ येथे सुमारे सहा हजार झाडांचे संवर्धन करून वनराई साकारली आहेत. आपलं पर्यावरण नामक संस्था स्थापन करून जिल्ह्याभरात वृक्ष लागवडीसाठी काम करीत आहेत. त्यांच्याशी महापालिकेच्या देवराई प्रकल्पाबाबत केलेली बातचीत...प्रश्न: महापालिकेने देवराई साकारण्यास सुरूवात केली आहे. तुम्ही यापूर्वी देखील देवराई साकारली आहे. त्याबद्दल काय वाटते?गायकवाड- नाशिक महापालिकेच्या वतीने देवराईचे संकल्पना राबविली जात आहेत ही खूपच चंगली बाब आहे. देवराईतील देशी झाडांना जास्त देखभाल करावी लागत नाही. म्हणजेच ती मेंटेनन्स फ्री असतात. तसेच ती शहराची फुफ्फुसे असतात. नाशिक मध्ये पंधरा ते सोळा वर्षांपूर्वी उपनगरला माझ्या घराच्या जवळ महापालिकेच्या अर्धा एकर जागेत मी देशी प्रजातीची झाडे लावून देवराई साकारली होती. डॉ. प्रकाश आमटे आणि राज ठाकरे यांनी देखील ही देवराई बघितली होती. त्यानंतर मी अलिकडेच महापालिकेचे उद्यान उपआयुक्त शिवाजी आमले आणि सह्याद्री देवराईकार आणि अभिनेते सयाजी शिंदे यांना दाखवून अशाच प्रकारे शहरात अन्यत्र प्रकल्प राबविता येतील असे सुचवले होते. महापालिका आता त्याचे अनुकरण करीत आहेत. याचा आनंद वाटतो.प्रश्न: ‘देवराई’च्या निमित्ताने शहरात पर्यावरणपूरक झाडांची लागवड होतेय असे वाटते का?गायकवाड: निश्चितच. कारण यापुर्वी म्हणजेच सुमारे दहा वर्षांपुर्वी शहरात महापालिकेने विविध रस्त्यांच्याकडेला किंवा मोकळ्या भुखंडांवर ज्या प्रजातीची लागवड केली आहे, त्यामध्ये महापालिकेकडून वृक्षप्रजाती निवड चूकीची ठरली. परदेशी प्रजातीला महत्त्व दिले गेले. परिणामी शहराच्याकडेला जरी हिरवळ नजरेस पडत असली तरी त्या झाडांचा कुठलाही फायदा पर्यावरणाला किंवा जैवविविधतेला होत नाही. उलट वादळवाºयात ही झाडे उन्मळून पडतात आणि नागरिकांच्या वाहनांने नुकसान होते. त्यानंतर दोष झाडांना दिला जातो. तसेच या झाडांची अवाढव्य व अनियंत्रित वाढ महावितरणची डोकेदुखी ठरते आणि पावसाळापुर्व छाटणीच्या नावाखाली अशास्त्रीयपध्दतीने झाडांच्या फांद्या  कर्मचा-यांकडून तोडल्या जातात. त्यामुळे झाडाची नैसर्गिक रचना बिघडते. परिणामी झाड अधिकच धोकादायक होते.देवराई’ प्रकल्पामुळे महापालिकेकडून योग्य प्रकारची भारतीय प्रजातीची वृक्ष लागवड होत आहे. आपलं पर्यावरण संस्थेकडून याबाबत काटेकोरपणे काळजी घेत उद्यानविभागाला रोपांच्या प्रजाती सुचविल्या गेल्या आहेत. यामुळे नजीकच्या काळात शहराचे पर्यावरण संतुलन राखले जाणार असून जैवविविधताही विकसीत होण्यास मदत होणार आहे.प्रश्न: तुमच्या देवराईचे वैशिष्ट काय आणि महापालिकेने आणखी काय केले पाहिजे..गायकवाड: माझ्या घराजवळ साकारलेल्या देवराईत पर्याेवरण पुरक झाडे लावली आहेत. १५३ देशी प्रजातीची झाडे लावली आहेत. विदेशी गुलमोहर, रेनट्री, काशिद अशी झाहे लावण्यापेक्षा ज्यामुळे फुलपाखरे, पक्षी आणि मधमाश्या येतील अशाप्रकारची झाडे लावणे आवश्यक असते. महापालिकेने आत्ताशी त्याची सुरूवात केली आहे. परंतु आता अशाप्रकारची झाडे लावली पाहिजेत तसेच रस्त्याच्या कडेल देखील अशीच झाडे लावली पाहिजेत. महापालिकेने यापूर्वी वृक्षारोपण केले आहे परंतु त्यात अशा विदेशी झाडांचा समावेश होता. त्याच बरोबर दुभाजकात कोणती झाडे लावावी याबाबत देखील मी महापालिकेला पत्र दिले आहे. बोगनवेली सारखी झाडे लावून काय उपयोग परंतु वृक्ष लागवडीचे नियोजन असले पाहिजे.प्रश्न: नागरीकही अनेकदा वृक्षारोपण लावतात, त्यांना काय सल्ला द्याल..गायकवाड: नागरीक हौसेने झाडे लावतात. परंतु आपण लावलेली झाडे चुकीची असता कामा नये याची काळजी घेतली पाहिजे. जेवणात जसे वरण,भात, भाजी, चटणी, कोशींबीर आवश्यक असते. त्याप्रमाणे झाडे देखील सर्वप्रकारची असली पाहिजेत. घराच्या परीसरात थेट वडाचे झाड लावता येणार नाही परंतु सुपारी, सिल्व्हर ओक, सोन चाफा, बकुळ अशी झाडे असली पाहिजेत. 

टॅग्स :environmentवातावरणNashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाforestजंगल