संगणकाच्या युगात टपाल पेटी लुप्त होण्याच्या मार्गावर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 00:20 IST2021-07-03T23:15:24+5:302021-07-04T00:20:35+5:30

सायखेडा : सध्याचे युग संगणकाचे युग आहे. एकमेकाच्या संवादासाठी आता मोबाइलची क्रांती झाली आहे. आधुनिक संदेशवहनासाठी पूर्वीच्या पत्राची जागा आता ई-मेल, मेसेजने घेतले आहे. दूरवरचा प्रवास घडून हाती पडलेल्या पत्रासाठी आतुरतेने वाट पाहणारे बसल्या जागी एकमेकांशी संवाद साधत आहे. लाल रंगाची पत्रपेटी आता दिसेनाशी झाली आहे.

Mailboxes on the verge of extinction in the computer age! | संगणकाच्या युगात टपाल पेटी लुप्त होण्याच्या मार्गावर !

संगणकाच्या युगात टपाल पेटी लुप्त होण्याच्या मार्गावर !

ठळक मुद्देसंदेशवहनासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा होतोय वापर

सायखेडा : सध्याचे युग संगणकाचे युग आहे. एकमेकाच्या संवादासाठी आता मोबाइलची क्रांती झाली आहे. आधुनिक संदेशवहनासाठी पूर्वीच्या पत्राची जागा आता ई-मेल, मेसेजने घेतले आहे. दूरवरचा प्रवास घडून हाती पडलेल्या पत्रासाठी आतुरतेने वाट पाहणारे बसल्या जागी एकमेकांशी संवाद साधत आहे. लाल रंगाची पत्रपेटी आता दिसेनाशी झाली आहे.

गतिमान युगात याची जागा आता संगणकाने घेतली आहे.
आजघडीला तार, पत्र बंद झाले आहे. पत्रांमधील प्रेमभाव आदर आपल्या लेखनातून होणारी देवाण-घेवाण मोबाइल आणि संगणकाच्या कळफलकावर आली आहे. यामुळे लेखनाचा सराव थांबलाच म्हणायला हरकत नाही. पूर्वीच्या काळी गावात पत्र वाचणारे आणि लिहिणाऱ्यांची मोजकीच संख्या असायची, त्यांच्याकडे जाऊन आपले निरोप, खुशाली सांगून पत्राद्वारे पाठवत असत. आज काळ बदलला आहे. प्रगती होत परस्पर संवादाची साधने बदलली. शिक्षण आणि तंत्रज्ञानाने क्रांती घडवत सर्वांचे जीवन बदलले. प्रत्येक गावात पत्रपेटीसाठी लाल डबा लटकलेला असायचा, आता मात्र तो कुठेही दिसेनासा झाला आहे. खाकी पोशाखातील पोस्टमन यातील सारी पत्र गोळा करून पुढे पाठवत असे, आजही ज्या ठिकाणी तंत्रज्ञान पोहोचले नाही, तिथे याचाच वापर होत आहे. त्यावेळी येणाऱ्या आणि जाणाऱ्या पत्राची उत्सुकता लागून असायची. आज मात्र तंत्रज्ञानाच्या युगात हा पत्रप्रपंच काहीसा दुरावला आहे. पूर्वीच्या काळात तंत्रज्ञानाची फारशी प्रगती झालेली नव्हती. दूरवरच्या संवादासाठी पत्र हेच एकमेव साधन होते. आपत्कालीन प्रसंगी तार, टेलिग्रामचा उपयोग व्हायचा. आजच्या संगणकीय युगात यात अमूलाग्र बदल झाले आहेत. बसल्या जागी मोबाइलच्या मदतीने जगातील कानाकोपऱ्यापर्यंत थेट संवाद साधला जात आहे. ही सारी आधुनिक प्रगतीची किमया आहे. नाही तर काही वर्षांपूर्वी ताई, माई, आक्का, पोस्टमन मामांची वाट पाहत असत. कधी कधी तर ह्यआमचं काही पत्रबित्र आलंय काह्ण अशी विचारणादेखील पोस्टमनकडे केली जायची.

पूर्वी पत्राला खूप महत्त्व होते, त्यामुळे नोकरभरती किंवा सुखदुःखाचे सर्व निरोप हे पत्राद्वारेच मिळायचे. त्यात लग्नपत्रिकेपासून तर नोकरभरतीची ऑर्डर, न्यायालयात चालू असलेल्या खटल्याच्या नोटिशी, मनिऑर्डर, सर्व प्रकारचे निरोप पोस्टमन मामामार्फत मिळत असत. परंतु आता व्हॉट्सॲप, ई-मेल, फेसबुक या माध्यमांद्वारे काही क्षणातच सुखदु:खाचा निरोप संबंधित नातेवाइकापर्यंत पोहोचत असल्याने आता टपालपेटी दिसेनाशी झाली आहे.

Web Title: Mailboxes on the verge of extinction in the computer age!