पोलिस शिपाई महेंद्र उमाले यांचा गोदान एक्सप्रेस मधुन पडुन मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2019 19:26 IST2019-10-09T17:17:00+5:302019-10-09T19:26:03+5:30
लासलगाव : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या नाशिक दौऱ्याच्या पोलिस बंदोबस्तासाठी जाणारे जळगाव पोलिस दलातील कार्यरत असलेले पोलिस शिपाई महेंद्र एस. उमाले या कर्मचाºयाचा नाशिक जिल्ह्यातील लासलगाव येथील रेल्वे स्थानकावर जळगावकडुन नाशिककडे जाणाºया गोदान एक्सप्रेस रेल्वेतून पडून गंभीर जखमी झाल्यानंतर त्याला लासलगाव येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल केल्यानंतर वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वप्नील पवार यांनी तपासणी करून मृत घोषीत केले आहे.

पोलिस शिपाई महेंद्र उमाले यांचा गोदान एक्सप्रेस मधुन पडुन मृत्यू
लासलगाव : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या नाशिक दौऱ्याच्या पोलिस बंदोबस्तासाठी जाणारे जळगाव पोलिस दलातील कार्यरत असलेले पोलिस शिपाई महेंद्र एस. उमाले या कर्मचाºयाचा नाशिक जिल्ह्यातील लासलगाव येथील रेल्वे स्थानकावर जळगावकडुन नाशिककडे जाणाºया गोदान एक्सप्रेस रेल्वेतून पडून गंभीर जखमी झाल्यानंतर त्याला लासलगाव येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल केल्यानंतर वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वप्नील पवार यांनी तपासणी करून मृत घोषीत केले आहे.
बुधवारी (दि.९) दुपारी एक सव्वाच्या सुमारास गोरखपूर लोकमान्य टिळक टर्मीनल या गोदान एक्सप्रेस नावाने ओळखल्या जाणाºया रेल्वेतुन पोलिस शिपाई महेंद्र एस. उमाले (बक्कल नंबर जळगाव १५५६) पडताच लासलगाव रेल्वे स्थानकावरील हजर रेल्वे राखीव दलाचे पोलीस उपनिरीक्षक महेश महाले व पोलिस कर्मचारी नितीन टुपके यांनी जखमी अवस्थेत रूग्णवाहीकेतुन त्याला लासलगाव ग्रामीण रूग्णालयात नेल,े परंतु त्यांना मृत घोषीत करण्यात आले. पोलिस शिपाई महेंद्र उमाले यांच्या डोक्याला तसेच डावा पाय व उजवा पाय निकामी होऊन तसेच पाठीचे बाजुने गंभीर जखमा झाल्या होत्या. या प्रकरणी मनमाड रेल्वे पोलिस तपास करीत आहेत. ते नाशिक येथे राष्ट्रपती बंदोबस्त करण्यासाठी येत होते.