‘महावीर इंटरनॅशनल’तर्फे शिक्षक, तपस्वींचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2019 00:51 IST2019-09-26T00:51:03+5:302019-09-26T00:51:18+5:30

महावीर इंटरनॅशनल संस्थेच्या वतीने शहरातील विविध शाळांमधील शिक्षक तसेच जैन समाजातील पर्युषण पर्व काळात फक्त गरम पाण्यावर उपवास करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

 Mahavir International honors teachers, ascetics | ‘महावीर इंटरनॅशनल’तर्फे शिक्षक, तपस्वींचा सत्कार

‘महावीर इंटरनॅशनल’तर्फे शिक्षक, तपस्वींचा सत्कार

नाशिक : महावीर इंटरनॅशनल संस्थेच्या वतीने शहरातील विविध शाळांमधील शिक्षक तसेच जैन समाजातील पर्युषण पर्व काळात फक्त गरम पाण्यावर उपवास करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
रोटरी हॉल गंजमाळ येथे आयोजित या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून इंटरनॅशनल सौंदर्य स्पर्धेतील विजेत्या नमिता कोहक, उपस्थित होते. याप्रसंगी मान्यवरांनी महावीर इंटरनॅशनल संस्थेच्या विविध उपक्रमांचा गौरव केला. या सोहळ्याप्रसंगी मोनालिसा जैन, गौतम सुराणा, प्रा. विनय डोशी, पृथ्वीराज बोरा आदींनी मनोगतात तपस्वींचे महत्त्व आणि शिक्षकांचे योगदान याविषयी गौरव केला. यावेळी तपस्वींचा व शिक्षकांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तसेच जैन समाजाच्या वतीने विविध धार्मिक उपक्रम राबविण्यात आले.
सूत्रसंचालन संगीता बाफना यांनी केले. या कार्यक्रमास अनिल नहार, मनीष सोनी, अमोलचंद भंडारी, दिलीप पारख, विजय भन्साळी, किशोर गांग, राजेंद्र बाफना, महावीर राका, दिलीप टाटिया, किशोर बाफना, रंजनभाई शहा, आशीष नहार आदी मान्यवर उपस्थित होते.

Web Title:  Mahavir International honors teachers, ascetics

टॅग्स :Nashikनाशिक