महात्मा ज्योतीबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या आधार प्रमाणिकरणास सुरु वात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2020 06:26 PM2020-06-22T18:26:18+5:302020-06-22T18:26:58+5:30

ओझर : महाविकास आघाडी सरकारच्यावतीने राज्यातील शेतकऱ्यांसाठी महात्मा ज्योतीबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर करण्यात आलेली आहे. दि. ३० सप्टेंबर २०१९ रोजी थकीत असलेल्या व दि. ०१ एप्रिल २०१५ ते दि. ३१ मार्च २०१९ या कालावधीत राष्ट्रीयकृत, व्यापारी, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, ग्रामीण बँका, विविध कार्यकारी सहकारी संस्था यांच्याकडून शेतकºयाची घेतलेल्या अल्पमुदतीत पीक कर्ज व पुनर्गठित पीक कर्ज माफ होणार आहे. या योजनेच्या आधार प्रमाणीकरणास निफाड तालुक्यात सुरु वात झालेली असून त्याचा शुभारंभ लाभार्थ्यास प्रमाणपत्र देऊन करण्यात आला.

Mahatma Jyotiba Phule Farmers Debt Relief Scheme Aadhaar certification begins | महात्मा ज्योतीबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या आधार प्रमाणिकरणास सुरु वात

महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत निफाड तालुक्यातील शेतकºयांच्या आधार प्रमाणीकरणाचे प्रमाणपत्र देताना आमदार दिलीप बनकर.

Next
ठळक मुद्देनिफाड तालुक्यात यादीनुसार पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ

ओझर : महाविकास आघाडी सरकारच्यावतीने राज्यातील शेतकऱ्यांसाठी महात्मा ज्योतीबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर करण्यात आलेली आहे. दि. ३० सप्टेंबर २०१९ रोजी थकीत असलेल्या व दि. ०१ एप्रिल २०१५ ते दि. ३१ मार्च २०१९ या कालावधीत राष्ट्रीयकृत, व्यापारी, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, ग्रामीण बँका, विविध कार्यकारी सहकारी संस्था यांच्याकडून शेतकºयाची घेतलेल्या अल्पमुदतीत पीक कर्ज व पुनर्गठित पीक कर्ज माफ होणार आहे. या योजनेच्या आधार प्रमाणीकरणास निफाड तालुक्यात सुरु वात झालेली असून त्याचा शुभारंभ लाभार्थ्यास प्रमाणपत्र देऊन करण्यात आला.
यादीनुसार पात्र शेतकºयांचे आधार प्रमाणीकरण करण्यात येत असून प्रमाणपत्र पात्र झालेल्या शेतकरी सभासदांना शासनातर्फे शेतकरी कर्जमाफीचा लाभ देण्यात येणार आहे. आधार प्रमाणिकरण करताना सोप्या, सुटसुटीत अशा पद्धतीने बँक खाते क्र मांक, आधार कार्ड व बोटाचे ठसे यावरून माहिती तपासण्यात येत आहे. सदर प्रक्रि या २ मिनिटांच्या आत पूर्ण होत असून लाभ मिळाल्याची प्रक्रि या सुरू झाल्याचे शेतकºयांना त्यांच्या मोबाईलवर एसएमएस प्राप्त होत आहे. यामुळे शेतकºयांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
निफाड तालुक्यात या योजनेमध्ये एकुण २ लाखापेक्षा कमी कर्ज असलेले १३९८४ शेतकरी सभासद असून त्यांचे सुमारे १३३ कोटी ३६ लाख ४६ हजार रु पयांची कर्जमाफी होणार आहे. तसेच २ लाखापेक्षा जास्त कर्ज असणाºया ६१२२ शेतकरी सभासदांना १८२ कोटी ६७ लाख ८ हजार इतकी कर्जमाफी होणार आहे.
सदर आधार प्रमाणिकरणाचे काम पूर्ण झाल्यावर कर्जमाफीची रक्कम संबंधित शेतकºयाच्या बँक खात्यावर वर्ग होणार आहे. प्रमाणपत्र वाटपप्रसंगी आमदार दिलीप बनकर, नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेचे विभागीय अधिकारी राजेंद्र निकम, सहाय्यक विभागीय अधिकारी अविनाश महाजन, जिल्हा परिषद सदस्य सिद्धार्थ वनारसे, सुरेश खोडे, बापू गडाख, बँक इन्स्पेक्टर ज्ञानेश्वर वाटपाडे, नंदू तासकर, जिल्हा बँकेचे शाखा व्यवस्थापक गरु ड, सोनवणे, पवार, ढोमसे, पिंपळगाव सोसायटीचे सचिव नितीन कर्डेल आदींसह सभासद शेतकरी उपस्थित होते.

Web Title: Mahatma Jyotiba Phule Farmers Debt Relief Scheme Aadhaar certification begins

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.