शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi Oath-Taking Ceremony Live: नरेंद्र मोदी PM पदाच्या हॅटट्रिकसाठी सज्ज; ६९ खासदार घेणार मंत्रिपदाची शपथ
2
"आम्ही वाट पाहायला तयार"; अजित पवारांनी सांगितले मंत्रिपद नाकारण्याचे कारण
3
गुजरात ६, बिहार ८, यूपी ९, महाराष्ट्र...; जाणून घ्या, कोणत्या राज्यातून कुठल्या नेत्याची लागूशकते मंत्रीपदी वर्णी?
4
NCP : राष्ट्रवादीला केंद्रीय मंत्रिमंडळात मंत्रिपद का नाही? प्रफुल्ल पटेल यांनी सगळंच सांगितलं
5
नारायण राणे, स्मृती इराणी, अन्...; या कॅबिनेटमध्ये दिसणार नाहीत मोदी सरकार 2.0 मधील हे 20 दिग्गज चेहरे?
6
राष्ट्रवादी काँग्रेसला सध्या एकही मंत्रिपद का नाही? देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट शब्दात सांगितलं कारण
7
एकाचे वय 36 तर दुसऱ्याकडे 5000 कोटींची संपत्ती; केंद्रात TDP च्या 'या' दोन खासदारांना संधी
8
व्हीके पांडियन यांची राजकारणातून निवृत्ती; नवीन पटनायक आणि BJD ची मागितली माफी...
9
30 हजार पॅलेस्टाईन समर्थकांचा व्हाईट हाऊसला घेराव, जो बायडन यांच्या विरोधात निदर्शने
10
HDFC बँक ग्राहकांसाठी खुशखबर! EMI चा बोजा कमी होणार; वाचा बँकेचं प्लॅनिंग
11
'मातोश्री'कडून आमदार भास्कर जाधवांवर सोपवली मोठी जबाबदारी
12
Srishti Jain : "कोणाला उचलून घेऊन आलात?"; अभिनेत्री ढसाढसा रडली, सर्वांसमोर झालेला अपमान
13
'2047 पर्यंत भारत विकसित देश बनणार...' शपथविधीपूर्वी नरेंद्र मोदींची संभाव्य मंत्र्यांसोबत बैठक
14
'तारक मेहता..'मधली नवी 'सोनू' बोल्डनेसमध्ये भिडे मास्तरांच्या जुन्या सोनूलाही देतेय टक्कर
15
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ ची संभाव्य तारीख आली समोर! पण, मोदी सरकारमुळे पाकिस्तानची कोंडी 
16
"सगळ्यात जास्त फायदा प्रफुल्ल पटेलांना"; मंत्रिपदावरुन अजितदादांबाबत रोहित पवारांचा मोठा दावा
17
पंकजा मुंडे यांचा पराभव जिव्हारी, ऊसतोड कामगार युवकाने संपवले जीवन
18
Sunita Rajwar : "मी खूप संघर्ष केला, आई-वडिलांनी..."; ट्रक ड्रायव्हरची मुलगी बनली लोकप्रिय अभिनेत्री
19
जंक फूड, प्रोसेस्ड फूड खायला आवडतं? आताच थांबा; कॅन्सरसह 'या' आजारांचा मोठा धोका
20
Jayant Patil : "समुद्र नाही याची पुणेकरांना खंत होती म्हणूनच की काय भाजपाने पुण्यात समुद्रही आणून दाखवला"

...यंदा महासभा महाकवी कालीदास कलामंदिरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2020 6:43 PM

महापालिकेच्या इतिहासात नाट्यगृहात सभा घेण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे सभागृहाचे कामकाज कसे चालते या विषयी उत्सुकता आहे.

ठळक मुद्देअंदाजपत्रक मंजुरीच्या घाईसाठी महासभा घेण्याचा आग्रह

नाशिक :  कोरोनाचा संसर्ग टाळळ्यासाठी महापालिकेतील सर्व बैठका रद्द असल्या तरी आता लोकप्रतिनिधीच्या हट्टाखातर यंदा महासभा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रशासनाने हिरवा कंदिल दिल्याने यंदा महासभा येत्या २० मे रोजी महाकवी कालीदास कलामंदिरात होणार आहे. अर्थात, त्यावर नव्यापेक्षा जूनेच विषय अधिक आहेत. पाणी करार, सीबीएसई बोर्डाच्या शाळा सुरू करणे यासारख्या जुन्याच वादग्रस्त विषयांना त्यामुळे उजाळा मिळण्याची शक्यता आहे.कोरोना महामारीचे संकट देशावर घोंगावु लागताच मार्च महिन्यात शासनाने सर्व प्रकारच्या शासकिय बैठका आणि अन्य कामकाज स्थगित करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे महापौर सतीश कुलकर्णी यांनी देखील मार्च महिन्याची सभा रद्द केली त्यानंतर एप्रिल मध्ये तर आणखीनच भयंकर स्थिती देशभरात निर्माण झाल्याने पुन्हा ही सभा तहकुब करण्यात आली. मात्र आताही सभा घेण्यासाठी महापौर सतीश कुलकर्णी यांनी प्रयत्न सुरू केले. महापालिकेच्या सभागृहात १२६ नगरसेवक तसेच अधिकारी सुमारे पावणे दोनशे जण बसतात. नगरसेवकांचेकार्यकर्ते प्रेक्षागृहात असतात. मात्र, सध्या फिजीकल डिस्टसिंग पाळायचे असल्याने त्या दृष्टीने महापौर सतीश कुलकर्णी यांनी महाकवी कालीदास कलामंदिराची जागा निवडली आहे. सुमारे एक हजार आसन व्यवस्था असलेल्या या नाट्यगृहात फिजीकल डिस्टसिंग पाळून नगरसेवक आणि अधिकारी बसू शकतात,त्यामुळे ही जागा निवडण्यात आली आहे. महापालिकेच्या इतिहासात नाट्यगृहात सभा घेण्याची ही पहिलीच वेळ आहेत्यामुळे सभागृहाचे कामकाज कसे चालते या विषयी उत्सुकता आहे. दरम्यान, अशाप्रकारची सभा घेण्याच्या विषयात नाविन्य मात्र नाही. अंदाजपत्रक मंजुरीच्या घाईसाठी महासभा घेण्याचा आग्रह असल्याचे सांगितले जात असलेतरी प्रत्यक्षात मात्र प्रलंबीत जलकरार, सीबीएसई बोर्डाची शाळा सुरू करणे, सिंहस्थातील कामांचे ज्यादा रकमेची देयके देणे अशा प्रकारचे जूनेच विषय आहेत. त्यात केवळ महापालिकेने भूसंपादनासाठी प्राधान्य क्रम ठरविणेहा विषय केवळ नवीन आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस